शिक्षण व सामाजीक क्षेत्रातील अवलिया माधव केंद्रे गूरूजी

शिक्षण व सामाजीक क्षेत्रातील अवलिया माधव केंद्रे गूरूजी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : आज 22 जुलै २०२१ शिक्षकाच्या वाढदिवसाच्या आजच्या दिवशी आपले शिक्षकी व्रत सांभाळून, समाजासाठी धडपड करणा-या साने गूरूजींचा वारसा ख-या अर्थाने पुढे चालवणा-या गुरुजींबध्दल विशेषतः आजच्या दिवशी कृतज्ञता भाव व्यक्त करने महत्त्वाचे आहे.अस्याच समाजासाठी परार्थ भाव ठेवून खऱ्या गरजूंना मदत करणाऱ्या केंद्रे माधव शिवहार या शिक्षकाचा परिचय समाजाला व्हावा याच उद्देशाने हा लेख रूपाने शब्द प्रपंच केला आहे. तेंव्हा आपण आपल्या लोकप्रिय दैनिकातून या शब्दांकनाला प्रसिद्धी देऊन आजच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून कृतीशील शिक्षकाचा आदर्श समाजासमोर ठेवावा व चांगल्या कार्यास प्रोत्साहन द्यावे ही विनंती)
माणूस हा समाजशील प्राणी आहे असं म्हटलं जातं. तो समाजा शिवाय राहू शकत नाही व अनेक माणसांच्या समुहातूनच समाजाची निर्मिती होते. माणसावर ईश्वराचे सर्वाधिक प्रेम आहे. त्याचे कारण त्याच्याकडे श्रद्धा आहे, स्पर्शज्ञान आहे,भाषाज्ञान आहे, हास्य आहे व सर्वात महत्त्वाचे इतरांच्या संवेदना जाणून घेऊन त्या सोडविण्याची तळमळ आहे. असे चित्र जिथे दिसते तोच खरा माणूस. अन्यथा माझे ते माझे व तुझे तेही माझे ही पाशवी वृत्ती असणारे व्यक्ती शरीराने जरी मानस असले तरी ही ती पशु होत. आज आपण म्हणतो समाज फार बिघडलाय, समाजातील सर्वच क्षेत्रात स्वार्थ बोकाळला आहे पण अशातही काही चारित्र्यवान माणसं समाजासमोर आदर्श ठेवणारी पहावयास मिळतात असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे माधव शिवहार केंद्रे गुरुजी होत.
केंद्रेवाडी ता.अहमदपूर सारख्या एका वाडीत जन्माला येऊन त्यांनी केलेले कार्य एखाद्या महानगरातल्या स्वतःला विद्वान समजणा-यां पेक्षा कितीतरी मोठे आहे.तसे पाहिले तर त्यांचे वयही फार नाही त्यांचा जन्म २२जुलै १९८० रोजी माता चंद्रकलाबाई व पिता शिवहार यांच्या पोटी झाला. माता चंद्रकलाबाई व पिता शिवहार यांनी गावात परगावात जाऊन रोजंदारी करून माधव यास गुरूजी केले आज मीतीला ते केवळ चाळीस वर्षाचे आहेत पण कार्यकर्तृत्व मात्र शंभरीतल्या माणसाला लाजवेल असे आहे.त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या केंद्रेवाडीत पूर्ण केले.तर नंतर वाडी पासून काही अंतरावर असणाऱ्या सोनखेड-मानखेड येथे दररोज पायपीट करून माध्यमिक शिक्षण प्राप्त केले. घरची गरिबी, कोरडवाहू शेती, त्यात म्हणावे तेवढे उत्पन्न नाही अश्यातही शिकण्याची जिद्द सोडली नाही. नंतर बी.ए. पर्यंतचे शिक्षण त्यांनी महात्मा गांधी महाविद्यालय,अहमदपूर येथून घेतले. तदनंतर बी.एड.साठी ते शासकीय अध्यापक महाविद्यालय, परभणी येथे गेले.यावेळी मात्र त्यांना शिकवण्यासाठी आई वडिलांकडे पैसे नव्हते त्यावेळी आई-वडिलांनी काही शेती विकली,कारण शेतमजुरी करून शिक्षणाचे पैसे भरणे अशक्य असल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. केले तर नियमित राहून लोकप्रशासन विषयात एम.ए. केले. नंतर रोकडोबा माध्यमिक विद्यालय खंडाळी(रो.) ता. गंगाखेड येथे इंग्रजीचे माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले. सुरुवातीची काही वर्षे त्यांना विना अनुदानावर नोकरी करावी लागली. त्यांच्या या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांची पदवीधर असणारी पत्नी सौ. ज्योती माधव केंद्रे यांनी त्यांना खंबीर साथ दिली.आज मितीला त्यांना दोन मुले आहेत. तसेच माधव यास ०४ बहिणी आहेत यात जनाबाई यांनी आपल्या भावासाठी गरीबीमुळे शिक्षण सोडले
नोकरी लागून अनुदान मिळायला लागल्यावर खरे तर इतरांप्रमाणे त्यांनी साडी, गाडी व माडी, नोकरी,छोकरी व टपरी किंवा पैसा माझा परमेश्वरl पत्नी माझी गुरुl पोर माझी शाळीग्राम lपूजा कुणाची करू असे म्हणत जीवन जगायला हवे होते. असे जगले असते तर ते कसे अवलिया ठरले असते? त्यांनी यापेक्षा वेगळा मार्ग धरला म्हणून तर त्यांची दखल येणाऱ्या इतिहासाला घ्यावी लागणार आहे.
सर्वप्रथम त्यांनी हे जाणले की आपण कुठल्या परिस्थितीतून आलो आहोत?त्या परिस्थितीत जगताना किती संकटांना, उपेक्षांना सामोरे जावे लागते? अनेक वेळा शालेय साहीत्य प्राप्त होत नाही. खेड्यातल्या मुलांना इंग्रजी व अन्य विषय अवघड वाटतात पण गरीबीमुळे त्यांना शिकवणी ही लावता येत नाही.तरीही जगत जगत शिकावे लागते. असे शिकणारे अनेक विद्यार्थी माझ्या ही शाळेत आहेत? मग आपण शाळेतील विद्यार्थ्यां पासूनच का त्यांना मदत करण्याची सुरुवात करू नये? हे लक्षात घेऊन त्यांनी सर्वप्रथम आपल्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहीत्य यात वह्या-पुस्तके, स्कूल बॅग, चप्पल यासारख्या वस्तू स्वखर्चातून घेऊन द्यायला सुरुवात केली.माध्यमिक स्तरावरील आठवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना इंग्रजी विषय अवघड वाटतो म्हणून या विषयाचे अध्यापन वर्गात तर केलेच पण जादा तासिका घेतल्या. यासाठी ते बारा वर्षे खंडाळी(रो.) सारख्या छोट्या गावात राहून हे कार्य करीत राहिले.स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर प्रश्नावर नाटक बसविणे, विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा घेणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वृक्ष लागवड करणे असी कामे केली. तसेच २००६-०७,२००९-१०, २०१२-१३,२०१५-१६ या चार वर्षात एकही किरकोळ रजा घेतली नाही. नोकरीच्या १६ वर्षात आतापर्यंत त्यांनी केवळ ४४ किरकोळ रजा उपभोगल्या आहेत. एकदा माधव गुरूजी यांच्या पायाला मार लागल्याने डॉक्टरांनी पायाला प्लास्टर केले व ४० दिवस आराम करण्यास सांगितले पण माधव केंद्रे यांनी फक्त 3 दिवस आराम केला व ४० दिवस पायाला प्लास्टर असताना विद्यार्थी नुकसान होऊ नये म्हणून शाळेत जाऊन अध्यापन केले तसेच ज्या शाळेने आपल्याला रोजीरोटी दिली तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने त्यांना जो २०१७-१८ मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार दिला यात शासनाकडून एक लाख दहा हजार रुपये पारितोषिक रुपाने मिळाले त्यातील चोविस हजार रुपये त्यांनी स्वतः घातले व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करून काही रक्कम जमा केली व दोन्ही रकमेच्या एकत्रीकरणातून शाळेची रंगरंगोटी घडवून आणली.
माधव गुरुजींनी गरीब विद्यार्थी पाहायचे व त्यांना मदत करायचे असे व्रतच घेतले.त्यांच्याच शाळेत शिकत असणारा लखन बापूराव जंगले हा विद्यार्थी जो गर्भात असतानाच त्याचे वडील वारले.आईने अत्यंत हिमतीने या विद्यार्थ्यांला शिकविले पण आर्थिक अडचण उभी राहू लागली. तेंव्हा या विद्यार्थ्यांला फी भरण्यासाठी अन्य पारिवारिक अडचणीसाठी गुरुजींनी दहा हजार रुपयाची मदत केली. परिवारातील सगळ्यांनाच ते सतत मदत करत असतात. नंतर या विद्यार्थ्यांने हे पैसे वापस ही केले पण वेळेवर त्याला मदत करण्याची भूमिका गूरुजींनी घेतली. दहावीला अडचणीतून तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला त्याची दखल झी २४ तास या वाहिनीने घेतली. वाहिनीच्या संघर्षाला हवी साथ या उपक्रमात त्याची निवड झाली. माधव गुरुजींना या विद्यार्थ्यांबरोबर वाहिनीच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मिळाली.तेथील वातावरण त्यांना पाहता आले.हा उपक्रम उदय निरगुडकर सरांच्या संकल्पनेतून साकार झाला होता. तिथून परत आल्यावर आपणही असेच उपक्रम घेतले पाहिजेत असे त्यांना वाटायला लागले. या उपक्रमाला काय नाव द्यावे? असा प्रश्न पडला.त्यातच त्यांच्या इंग्रजी च्या आठवीच्या पुस्तकात एक पाठ होता ज्याचे नाव Seeing Eyes Helping Hands असे होते. त्यातून त्यांना पाहणारे डोळे मदत करणारे हात हे नाव सुचले. पहिल्यांदा या उपक्रमांतर्गत गंगाखेड,अहमदपूर या दोन तालुक्यातील प्रत्येकी दहा विद्यार्थी घ्यायचे ठरले पण ते विद्यार्थी अत्यंत गरीब, होतकरू, अनाथ, दिव्यांग, आत्महत्याग्रस्त पालकांचे, आई किंवा वडील नाहीत, आई-वडील आहेत पण सालगडी किंवा मजुरी करतात अशा विद्यार्थ्यांची निवड करण्याचे ठरले, त्यातून या पाल्यांना दहावीला ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत हा उपक्रम सन २०१६-१७ पासून सुरू झाला. पुढे २०१६-१७ पासून या उपक्रमाचा विस्तार करण्याचे ठरले व परभणी, लातूर जिल्ह्यातील पाल्यांना ही संधी देण्यात आली. नंतर मराठवाडा स्तरावर,पुढे राज्य स्तरावर अशी याची व्याप्ती वाढविण्यात आली. आणि हा उपक्रम २०१६-१७ पासून आजपर्यंत नियमितपणे घेतला जातोय.
पुढे असे ठरले की केवळ गुणवंत विद्यार्थ्यांपुरतेच सीमित न ठेवता याबरोबर समाजात ७० वर्षांपेक्षा पुढचे लोक निराधार आहेत.(ज्यांना अपत्य नाहीत )ज्यांना अन्य आर्थिक स्त्रोत नाहीत, अशा 30 लोकांची निवड करून त्यांना जीवन उपयोगी साहीत्य द्यायचे व तोही उपक्रम सुरू केला गेला.
याचबरोबर माधवराव हे स्वतः हाडाचे शिक्षक आहेत.त्यामुळे त्यांना वाटले की अशा सर्व दृष्टीने मागास असलेल्या मुलांना अनेक अडचणी सहन करत गुरुजी घडवत असतात. त्या गुरुजींचा ही यथोचित सन्मान झाला पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार देण्याचे ठरवले. या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक शिक्षक निवडला जातो. या कामी प्रत्येक जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची शिफारस ध्यानात घेतली जाते.हा उपक्रम देखीलअत्यंत प्रामाणिकपणे चालवला जातो मागच्या वर्षी हा पुरस्कार मलाही प्राप्त झाला आहे.याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. आजपर्यंत या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.ज्यात लातूर जि.प. चे अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके,माजी आ.विनायकराव पाटील, शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी, जि. प. सदस्य अशोक काका केंद्रे, अहमदपूर पं.स. सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, झी २४ तास चे माजी संपादक उदय निरगुडकर यांची उपस्थिती लाभली आहे.
याकामी आर्थिक बाबी कशा उपलब्ध केल्या जातात ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. माधव गुरुजी स्वतः मे महिन्याच्या म्हणजेच सुट्टीच्या कालावधीचा पगार घेत नाहीत तो या कामी वापरतात. यासाठी त्यांनी २०१२ साली रोकडोबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केंद्रेवाडीची स्थापना केली आहे. या कामी आर्थिक व अन्य सहकार्य लातूर जिल्ह्यातील दानशूर दांपत्य म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे ते अशोककाका केंद्रे,सौ. आयोध्याताई केंद्रे यांचे त्यांना लाभते. या दाम्पत्याने आपल्या पदाची मिळालेली पगार ही याकामी देऊन टाकतात. पदावर नसतानाही त्यांनी या कामी आर्थिक मदत केलेली आहे व करताहेत. या कामी गुरुजींचे बंधू नागनाथ शिवहार केंद्रे यांचेही मोलाचे सहकार्य लाभते.
गुरुजींचे हे काम पाहून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यात राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासनाने देऊन गौरविले आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा जिल्हास्तरीय पुरस्कार, महात्मा फुले शिक्षक परिषदेचा जिल्हास्तरीय पुरस्कार, मानवविकास राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श शिक्षक समितीचा विभाग व राज्यस्तरीय पुरस्कार, मनुष्यबळ विकास अकादमी मुंबई यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार, आदी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
असा हा आपली स्वतःची पगार समाजकार्याला देऊन गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण घडवून आणणारा, निराधारांना खऱ्या अर्थाने आधार देणारा, अवलिया शिक्षक माधवराव केंद्रे गुरुजी हे खरोखरच समाजासाठी एक आदर्श आहेत.त्यांनी संत तुकाराम महाराजांचा –
जे का रंजले गांजलेl त्यासी म्हणे जो आपुलेl
तोचि साधु ओळखावाl
देव तेथेची जाणावाl
हा अभंग आयुष्यात कृतीतून खरा उतरविला आहे. हे समाजसेवेचे घेतलेले वृत्त ते जन्मभर चालवणार आहेत. अशा या कर्मयोगी, उपक्रमशील, हाडाच्या शिक्षकाला माझे शतशः नमन.
दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत उच्चविभूषित ख्यातनाम समाजसेवक म्हणून ते लातूर व परभणी जिल्हात प्रसिध्द आहेत श्री माधव केंद्रे समाजासाठी ध्येयवेडे व्यक्तिमत्व म्हणून सौ . अयोध्याताई केंद्रे व श्री अशोक काका केंद्रे व गावकऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांचा चेहरा समोर करून त्यांना गावकऱ्यांनी बिनविरोध सरपंच केले पण शासनाने आरक्षण नंतर सोडल्यामुळे अडचण येऊ नये म्हणून त्यांच्या पत्नीला म्हणजे सौ . ज्योती माधव केंद्रे यांच्यानावे त्यांना गावकऱ्यांना पद दिले लागलीच गाव तेथे खांब योजना राबवून गाव प्रकाशमय केले आहे सौं. अयोध्याताई केंद्रे वाढदिवसानिमीत्त कोरोनाला प्रतिबंघ व गावात ऑक्सीजनप्रमाण वाढावे यासाठी 27 जुलैला 2700 वृक्ष लागवड केली जाणार आहे वृक्षांची खरेदी केली आहे आता श्री अयोध्याताई व अशोक काका केंद्रे यांच्या आशीर्वादाने व खरोखर माधव केंद्रे यांच्पा रूपाने गावाचा विकास होईल अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे

                                                                                                                                      प्रा. डॉ. रामकृष्ण बदने
  ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर,
                                                                                                                                  ता.मुखेड जि.नांदेड
                                                                                                                                   ९४२३४३७२१५

About The Author