प्रतिकुल परिस्थितीत कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी दलित समाजात चळवळ वृद्धींगत करुन जिवंत ठेवली – प्रा बालाजी आचार्य
अहमदपूर ( गोविंद काळे ) : भाऊसाहेब वाघंबर अभिवादन सभा या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी रिपाइं नेते लक्ष्मणराव तिकटे, प्रमुख वक्ते प्रा.बालाजी आचार्य सर, प्रमुख पाहुणे समाजभूषण संजयभाऊ कांबळे,युवा नेते श्रीकांत भाऊ बनसोडे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते भगवान ससाणे,चाकुरचे पॅंथर नेते मधुकर वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल तलवार,एम.आय.एम चे तालुकाध्यक्ष जिलानी मणियार, पत्रकार अजय भालेराव, बजरंग जाधव, प्रमुख संयोजक तथा रिपाईचे तालुकाध्यक्ष अरुणभाऊ वाघंबर , नरसिंग परतवाघ, आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी प्रमुख वक्ते प्रा. बालाजी आचार्य आपल्या भाषणात म्हणाले की
दलितांचे मार्गदर्शक भाऊसाहेब वाघंबर म्हणजे आंबेडकरी चळवळीला उभारी देणार तर उतुंग व्यक्तिमत्व ,जनसामान्याचे नेते म्हणून परिचत होते त्यांच्या कार्य कृतृत्वाने ढाण्यावाघ ,कर्मवीर झाले सदैव भाऊसाहेब आम्हाला आठवणीत राहतील काल स्मृतीदिन आज २०जुलै रोजी त्यांची जंयती या निमित्त त्यांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन
भाऊसाहेबा बदल्ल बालपणापासूनच आकर्षण होत लढाऊ बाणा, खंबीर नेतृत्व अधिकारी ,कर्मचारी वर्गावर छाप असणारे शोषित, वंचित अन्यायग्रस्त बहुजनाचे नेते सतत मोठया आवाजाने अन्याय अत्याचाराच्या विरोधात डरकाळी फोडायचे एक नेता किंवा कार्यकर्ता कसा असला पाहीजे हे भाऊसाहेब वाघंबर कडे पाहिल्यावर लक्षात येवू शकते.त्यांच्या तालमीत अनेक नेते घडले.किबहून दूर्लक्षीतांना, वंचीताना व्यासपीठ,मान,सन्मान मिळवून देण्याचे काम भाऊसाहेब जाणीव पूर्वक केले एवढा कणखर,ढाण्यावाघ तेवढाच आतून अतिशय मृदू सु-स्वभावी असलेला हा नेता मी जवळून पाहीला आहे.
भाऊसाहेब आणि आंदोलन हे एक अहमदपूर तालुक्याचे समीकरणच बनलं होतं.आजही तहसीलचे आणि पोलिस स्टेशनचे रेकॉर्ड काढून पाहिले तर प्रत्येक आठवड्याला लोकांच्या विविध प्रश्नावर भाऊसाहेबांनी लढे उभे केले.
माझ्या माहीती प्रमाणे तालूक्यात अण्णाभाऊ साठे यांची पहीली जयंती सार्वजनीक स्वरूपात भाऊसाहेब वाघंबर यांनीच सूरू करण्यासाठी पुढाकार घेतला.या कामी रिपाई चे जेष्ठ नेते बाबासाहेब कांबळे, समाजभूषण संजयभाऊकांबळे,अँड.टी.एन.कांबळे, दलितमिञरफीकभाईअहमद,उत्तमराव माने,श्रीकांत बनसोडे आदीं त्यांच्या सोबत असायचे. लोकांच्या प्रश्नावर या भागात लढणारा नेता जर कोण असेल तर त्याचे नांव आहे भाऊसाहेब वाघंबर म्हणावे लागेल महाराष्ट्रामध्ये,जिल्ह्यात,तालूक्यात कोठेही दलित,अल्पसंख्याक, बहुजन वंचित समाजावर अन्याय झाल्यानंतर पहिल्यांदा जर कोण घटनास्थळी भेट देत असेल तर ते नांव भाऊसाहेब वाघंबर हे होय.भाऊसाहेब यांचा इथल्या राजकीय समाजिक, सांस्कृतीक अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड असा दबदबा होता. एखादा निर्णय भाऊसाहेब यांनी घेतला तर सहजासहजी ते निर्णय मागे घेत नव्हते. परिणामाची भीती न बाळगता समाज हितासाठी काम करणारा नेता म्हणून मला भाऊसाहेब चांगले आठवतात. त्यांच्या आठवणीना उजाळा देत असताना प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि चळवळी अंदोलन, कार्यक्रम, कसे करावेत ह्या मार्गदर्शन करीत होते तालुक्यातल्या गायरानाचे प्रश्न, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न,अतिक्रमण धारकांचे प्रश्न,पिण्याच्या पाण्याचे प्रश्न अशा विविध प्रश्न व अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावर भाऊसाहेब झूंजारपणे लढलेले आम्ही जवळून पाहिले आहे. कुठल्याही गावांमध्ये अत्याचार झाल्यानंतर पहिला कार्यकर्त्या जर घटनास्थळी कोणी गेला असेल तर ते भाऊसाहेब.सबंध तालूक्यात अक्षरशः पायी चालत जावून महामानवांच्या जयंत्या या पठ्ठ्याने साज-या केल्याचे आजही लोक सांगतात. म्हणून अगदी गावपातळीपासून वरिष्ठ पातळीवरील अतिशय दांडगा संपर्क असणारा हा लोकनेता कर्मवीर होता
भाऊसाहेबांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रत्येक गोरगरीब महिलांसाठी साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम घेत हा वसा त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा मूलगा रिपाई तालुका अध्यक्ष अरुणभाऊ वाघंबर यांनी सूध्दा चालविलेला आहे हे विशेष..
शिक्षणाचा अभाव जरी असला तरी प्रशासकीय अधिकाऱ्यावर भाऊसाहेबांची प्रचंड छाप होती. जिल्हाधिकारी असो की पोलीस अधीक्षक त्यांच्यासमोर निडरपणे भाऊसाहेब बोलायचे.अतिशय पहाडी भारदस्त आवाजामध्ये ते भाषण करायचे.कोणी ही असो चक्क तोंडावर टीका टिप्पणी करण्याची धमक या तालुक्यांमध्ये त्यांच्याकडे होती. पूढे कार्यकाळात अनेक चढ-उतार याठिकाणी आले परंतु त्याला न डगमगता भाऊसाहेबांनी सातत्याने याठिकाणी समाजसेवा केली.एवढंच नव्हे तर भाऊसाहेब यांच्या खंबीर अशा पाठिंब्यावरच कोपरा येथे अहमदपूर तालुक्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्ही साकारू शकलो कोपरा येथे गावठाण जमीनीवर गावातील धनदाड्यांनी अतिक्रमणकरून घरे बंगले उभारण्याचे ठरविले होते तेव्हा तेथे माझे काका भाऊसाहेबांवर निसीम प्रेम करणारे बाबूराव आचार्य यांच्या मार्गदर्शनाखालीअ असताना गोरे पेंटरकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेचा बोर्ड आणून अतिक्रम केलेल्या जागेवर मी स्वतः आणि विश्वनाथ आचार्य , पंढरी आचार्य ,रोहिदास आचार्य , वामन लांडगे ,रंगनाथ कांबळे यांनी रोवला आणि महापुरूषाच्या नावाची घोषणाबाजी केली कोपरा येथील अतिक्रम धारकांनी पोलिसांना कळविले तेव्हा ही बातमी बाबूराव आचार्य यांनी भाऊसाहेबांना कळविताच भाऊसाहेब धावतपळत आले आणि गावठाणच्या जागेवर महापुरूषांचे पुतळे ज्यांना घरे नाहीत, त्याची घरे उभा करावेत असाच ठराव त्यांनी मांडला कोपरा येथे रंगनाथ कांबळे याचं घर आणि झोपड्डपट्टी असे अनेक घर भाऊसाहेबामुळेच तालुक्यात आहेत तसेच आज कोपरा येथे बाबासाहेबाचं स्मारक उभे आहे भविष्यात उभे राहतील भाऊसाहेबांनी अशी अनेक कामे केली त म्हणून आठवणीतील भाऊसाहेब हे मार्गदर्शक आहेत.
कालांतराने भाऊसाहेब वृद्धापकाळाने खचुन गेले परंतु वाघच तो…तो कसला खचनार…??? शेवटपर्यंत भाऊसाहेब चळवळीच्या माध्यमातून डरकाळ्या देत राहीले.भाऊसाहेब अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये दलित समाजाचे कवच-कुंडल ठरले होते म्हटलं तर या ठिकाणी अतिशयोक्ती होणार नाही.
अशा या नेत्यांचे मोठेपण मात्र प्रस्थापीत राजकीय लोकांनी ओळखले नाही लोकशाहीतील निवडणूकीचं कुठलंच पद मिळू दिले नाही ना कुठल्या समितीवर काम करण्याची भाऊसाहेबांना संधी दिली नाही. हेही तेवढेच खरे आहे. म्हणून शेवटचा काळ भाऊसाहेबांचा थोडासा कठीण गेला अशा परिस्थितीमध्ये समाजासाठी लढले पाहिजे समाजाच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत यासाठी भाऊसाहेब नंबर शेवटपर्यंत लढत राहिले त्यांच्या तालमीत असंख्य नेते याठिकाणी घडले या गोरगरीब,दलित अल्पसंख्याक वर्गाच्या लोकनेत्त्याच्या स्मृतिदिनी व 84 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. शेवटी आपल्या भाषणात प्रा. आचार्य सर म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर आभार प्रदर्शन पञकार अजय भालेराव यांनी सर्वांचे मानले.