प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूलाचा प्रलंबीत हप्ता तातडीने वितरीत करावा..!
म्हाडाच्या मुख्यअभियंत्याकडे डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची मागणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपालीका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकूल धारकांचे प्रलंबीत अनुदान तातडीने वितरीत करावे अशी मागणी युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण चे मुख्यअभियंता 2 सूनिल जाधव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
म्हाडा कडे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,अहमदपूर नगर पालिका क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यातील मंजूर असलेल्या 211 घरकूलांना मंजूरी देण्यात आली होती. त्यानूसार शहरात अनेक घरकूलांचे बांधकाम हे अंतीम टप्प्यात आहे.मात्र प्रत्येक घरकूल धारकांचे 90 हजार रूपयाचा हप्ता नगरपालिकेकडे आलाच नसल्याने घरकूल धारकांत या प्रकरणी तीव्र नाराजी आहे.संबंधीत नागरीक गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपरिषदेकडे वारंवार चकरा मारत आहेत.पहिलेच कोरोना काळामूळे खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण असताना घरकूल मंजूर झाल्याने कसेबसे हातउसने/ व्याजी रक्कम काढून त्यांनी घरकूलांचे बांधकाम केले आहे.मात्र या घरकूल धारकांचा प्रत्येकी 90हजार एवढे अनुदान प्रलंबीत असल्याने येथील घरकूलधारक अडचणीत आले आहेत.
तसेच नगर परिषदेने आणखीन 142 लोकांचा घरकूलांचा प्रस्ताव (डिपीआर) दाखल केला होता.त्यास मंजूरी मिळाली असून पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी 40 हजार रूपयांचा लाभार्थ्यांना वर्ग केला आहे. मात्र उर्वरीत हप्ता सूध्दा प्रलंबीत आहे.सदरील नागरीकांनी सुध्दा घरकूलाच्या बांधकामास सूरूवात केली आहे मात्र उर्वरीत हप्ता मिळाला नसल्याने बांधकामे प्रलंबीत आहेत.तसेच संबंधीतांनी कोरोना सारख्या मोठ्या कठीण परिस्थितीत बांधकाम सूरू केल्याने तेही अडचणीत सापडले आहेत.
एकूणच ही परिस्थिती स्थानिक पातळीवर पहायला मिळत असून घरकूल बांधकामाचा हप्ता वेळेवर मिळत नाही अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण होत असल्याने एवढ्या महत्त्वपूर्ण महत्वाकांक्षी योजने बद्दल नागरीकांमध्ये नकारार्थी भावना निर्माण होत आहे
तेंव्हा 353 लाभार्थांचा मंजूर घरकूलाचा प्रलंबीत असलेले पैसे तातडीने नगर परिषदेकडे वर्ग करून नागरिकांचे घरकूलाचे स्वप्न साकारण्यास मदत करावी.
या वेळी मुख्यअभियंता 2 सूनिल जाधव यांनी संबंधीत अधिकार्यांना बोलवून एक महिन्याच्या आत तातडीने घरकूलाचा निधी पालीकेकडे वितरीत करण्याचे आदेश दिले.