दयानंद कला महाविद्यालयाची विद्यार्थीनी झाली कॉस्च्युम डिझाईनर

दयानंद कला महाविद्यालयाची विद्यार्थीनी झाली कॉस्च्युम डिझाईनर

लातूर (प्रतिनिधी) : दयांनद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय, हे असे महाविद्यालय आहे ज्या ठिकाणी केवळ पारंपारीक अभ्यासक्रम न शिकविता व्यवसायीक अभ्यासक्रमही शिकविले जातात. उदा: फॅशन, अॅनीमेशन, अॅडमिनीस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. Covid-19 च्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात 2020 च्या बॅचमधून पदवी पुर्ण केलेल्या श्रीदेवी दत्तात्रय झिंजरुटे यांनी लॉकडाऊनच्या काळात सुध्दा ‘द स्टोरी ऑफ लागीर’ या मुव्हीमध्ये व ‘हनीमुन ब्रेकअप’ या वेबसिरीज मध्ये कॉस्च्युम डिझाईनर म्हणून काम केले आहे. आणि फिल्मइन्डस्ट्रीज मध्ये नावलौकीक मिळविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आपल्याला घडविण्यामध्ये दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, फॅशन विभागातील विभागप्रमुख प्रा. सुवर्णा लवंद, प्रा. हर्षा जैन (पिपाडा), प्रा. पी.के. देशमुख, प्रा. डी.एस. निलावार, प्रा. पी.व्ही. बिराजदार,, प्रा. आर.जे. नाईक, प्रा. एस.टी. हालदार, प्रा. के.एस. बजाज आणि कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव आदींचे चांगल्या पध्दतीचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच मला पुण्यासारख्या शहरामध्ये लॉकडाऊन मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी दयानंद कला महाविद्यालयाचे मनापासून आभार व्यक्त करते अशी भावना तिने व्यक्त केली. तिचा महाविद्यालयात आज भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व तिला पुढील वाटचालीसाठी संस्था व महाविद्यालयतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Author