उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

हडोळती (गोविंद काळे) : हडोळती ता.अहमदपूर येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
(१)आशा स्वयंसेविका यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
(२)रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
(३)प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.

असे विविध उपक्रमांनी दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी लातूर जिल्हा उपाध्यक्ष अरबाज पठाण, अक्षय बोडके, चांदखां पठाण युवा मंच उपाध्यक्ष प्रल्हाद मोरे, विनोद कांबळे, रफी शेख, श्रीशैल्य हेंगने, निखिल गायकवाड, आदिल शेख, गोपी शेरे, संगम कांबळे, मनोज कोकाटे आदि. कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!