राष्ट्रसंतानी जसा समाज घडवला तसा समाज पुढे घडवायचा असेल तर राजशेखर महाराजांना साभालायला पाहिजे – सभापती पाटील

राष्ट्रसंतानी जसा समाज घडवला तसा समाज पुढे घडवायचा असेल तर राजशेखर महाराजांना साभालायला पाहिजे - सभापती पाटील

तोंडार (प्रतिनिधी) : वसुधंरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य डौ. शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रतेक समाजाचा भक्ताचा ह्रदयात आहेत, आज जरी ते आपल्यात देहरुपी जरी नसले तरी ते प्रतेक भक्ताचा मनात आहेत, त्यानी आपली ह्यात फक्त अन् फक्त समाजासाठी घातले, त्यानी समाज घडवला, जिवणाचा मार्ग दाखवला असाच जर समाज यापुढे घडवायचा असेल तर राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज यांची गादी व सर्वाधिकार ज्याना दिलेत ते राजशेखर शिवाचार्य महाराज यांना सभालायची जबाबदारी आपल्या विरशैव सद्भक्ताची आहे असे प्रतिपादन तोंडार ते अहमदपुर (भक्तीस्थल) या पायी व मोटारसायकल रॅली चा प्रस्थान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या वेळी मंचावर उदगीर तालुका लिंगायत समाजाचे अध्यक्ष सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापूरे हे होते ,तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपुर विरमठाचे सिहाशनाधीष राजशेखर शिवाचार्य महाराज, गुरुवर्य भगत महाराज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, लिंगायत समाजाचे राजकुमार बिरादार बामणीकर, मा.आ.मनोहर पटवारी, प्रशांत धुलशेट्टे, शेतकरी बिग्रेड चे सर्वे सर्वा वक्ते दत्ता खंकरै, ई मान्यवर उपस्थित होते.या वेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचा सत्कार दिडी चे अध्यक्ष चंद्रकांत हैबतपुरे याचा परिवारा तर्फे करण्यात आले. पुढे सद्भावना व्यक्त करताना पाटील सांगितले की आज अप्पाजीचा दैवाक्या नंतर विरमठावरील वाद निर्माण झाले आहेत, यात अप्पांनी आपल्या हयातीत एखाद्य सद्भक्ताने गळ्यात घातलेला हार सुद्धा त्यानी आपल्या जवळ ठेवले नाहीत, तर तोच हार त्या भक्ताचा गळ्यात घालत होते, एवढा निस्वार्थ पणा अप्पांनी जोपासला होता, मग आज त्याचा संपत्ती वरुन वाद कशासाठी! असा प्रश्न ही त्यानी उपस्थित केला,अप्पा ची ख्याती पंचक्रोशीत आहे, त्याचा अनुष्ठान चा वेली देशाचा कानाकोपर्यातुन भाविक येत होते, व अप्पा ची जी इच्छा होती की ज्या ठिकाणी गुरु पोर्णीमेचा दिवशी आलेल्या भक्ताना आचरण करत होते,त्याच ठिकानी माझी लिंग प्रतिष्ठापना करा, म्हंजे माझे रुप येथेच भक्ताना दिसुन येईल, आज तीच इच्छा आपण सर्वानी मिळून पुर्ण करायची आहे व गत विस वर्षा पासुन जी गुरु पोर्णीमेचे औचित्य साधून माहेश्वरमुर्ती शि.भ.प रतिकांत स्वामी याचा मार्गदर्शनाखाली तोंडार ते अहमदपुर (भक्तीस्थल) पद यात्रा कायम ठेवून अप्पांचा चरणी नतमस्तक होऊ व त्याचा जागी त्याची जी गादी पत्करली आहेत ते राजशेखर शिवाचार्य महाराज यांचा साभाल करणे व त्याचा हातुन समाज घडावे या साठी ही जबाबदारी प्रतेक विरशैवाचे आहे असे त्यानी सांगितले. या नंतर राजशेखर शिवाचार्य महाराज यानी व गुरुवर्य भगत महाराज यानी सर्व भक्ताना आचरण केले, व मा.आ.पटवारी , राजकुमार बिरादार, प्रशांत धुलशेट्टे ,यानी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संजय बिरादार कुमठेकर, अ.पोलीस उपनिरीक्षक बस्वराज तपसाले, म.बसवेश्वर सेवा भावी मंडल तोंडार चे अध्यक्ष सुशिल पटवारी हे मान्यवर ही आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी रतिकांत स्वामी, चंद्रकांत हैबतपुरे, वैजनाथ धनेप्पा, संजय मालोदे,बाबुराव करंजे, प्रशांत मुळे, शरनु पाडे,कमलाबाई मात्रे, रूपेश हैबतपुरे,अझर राठोड, ई नी परिश्रम घेतले, या वेळी सरपंच सौ. शैलेजा पटवारी,जि.प.सदस्या सौ. विजयाताई बिरादार, माधव पटवारी,राम पाटील, उपसरपंच निलकंठ बिरादार, गणपत कंठे,आनंदराव मालोदे, शंकर अप्पा हैबतपुरे, संगमेश्वर स्वामी, ई नागरिक व गावातील सर्व विरशैव महिला भजनी मंडल, पुरुष भजनी मंडल मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शि.भ.प.रतिकांत स्वामी यानी केले तर प्रास्ताविक दत्ता खंकरे,तर आभार प्रदर्शन पत्रकार संदीप बी.पाटील यांनी केले.

About The Author