सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून कमांडंट कमांडर बी के सिंह, सुरेश नागेंद्र, विनायक करेवाड, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, सीमा मेहत्रे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडंट कमांडर बी के सिंह आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, गुरु हे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल कशी करावी याचे शिक्षण आपल्याला देतात. निसर्ग हा देखील आपला गुरु आहे. कारण यांच्याकडूनही आपण खूप शिक्षण घेतो.

पुढे बोलताना ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जहालमतवादी गटाचे नेते, शिक्षक, समाजसुधारक, साहित्यिक, मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना प्रवृत्त करणारा नेता अशी लोकमान्य टिळकांची ओळख आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनायक करेवाड यांनी गुरुपौर्णिमा याबद्दल आपले विचार मांडताना म्हंटले, गुरुचे स्थान आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. गुरुमुळे आपल्याला जीवनात कसे वागावे याची माहिती मिळते. प्रमुख पाहुणे सुरेश नागेंद्र यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखले जाते. त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे विद्यालयाचे कमांडंट कमांडर बी के सिंह यांनी सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पेन भेट देऊन त्यांचा गौरव केला.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार सुधीर गायकवाड यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश पंगू, बालाजी कांबळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author