उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिना निमित्त भरत चामले आयोजित शेतक-यांचा सत्कार सोहळा संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : ना.अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील आपली शेतजमीन निष्ठेने कसणा-या, साधना म्हणून शेतीसाठी कष्ट जोपासणा-या, आपल्या शेतजमीनीच्या पोतानुसार वेगवेगळे वाण घेणा-या प्रयोगशील आणि प्रगतशील शेतक-याचा सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीरच्या वतीने रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयोजक भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार सोहळा आयोजित केला. ते शेतकरी पूत्र आहेत आणि हा सोहळा शेतक-यांचा आहे त्या अनुषंगाने कार्यक्रमाचा अध्यक्ष हा शेतकरीच असावा म्हणून प्रगत शेतकरी गुणवंत रामराव रोडगे यांची सपत्निक निवड केली गेली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष चोले (कृषी विकास अधिकारी जि.प.लातूर),श्री.महेश तीर्थकर (उपविभागीय कृषी अधिकारी),श्री.संजय नाबदे (तालुका कृषी अधिकारी ),श्री. गोरख दिवे (पो.निरिक्षक,उदगीर शहर), ,श्री.सातपुते(पंचायत समितीचे कृषी अधिकारी), किशनराव हरमुंजे ,बाबासाहेब काळे पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या वेळी पो.नि.गोरख दिवे यांनी आपण काबाड कष्ट करून जमवलेली पुंजी कशी सांभाळावी? सायबर फसवनूकी पासून कसे सावध रहावे. या बाबी समजावून सांगितले.या कार्यक्रमाअंतर्गत शेतक-यांना सुभाष चोले साहेब,महेश तिर्थकर, संजय नाबदे आदी मान्यवरांचे शेतक-यांशी हितगुजपर सखोल मार्गदर्शनपर भाषणे झाली.आणि इस्राईलच्या धरतीवर शेतक-यांना कमी पाण्यात विक्रमी उत्पादन कसे घ्यावे? यासाठी प्रोत्साहनपर डाॅ. सुधीर भोंगळे लिखित “शेती इस्राईलची” हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामकिशन नादरगे, व्यंकट पेठे,बाळासाहेब नवाडे,दत्तात्रेय काकडे, संगम निडवदे, युवराज कांडगीरे, ओम केंद्रे,संग्राम राठोड,कल्पेश नवाडे, शिवा तेलंगे, विजय येडले, राजीव पाचंगे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नावंदी विकास सोसायटीचे चेअरमन बालाजी परगे यांनी केले.तर आभार प्रदर्शन बाबुराव अंबेगावे यांनी मानले.