लोकमान्य टिळक यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
लातूर (प्रतिनिधी) : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अणि तो मिळवणारच अशी गर्जना करणारे थोर व्यक्तिमत्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची सुरवात करणारे जहाल व्यक्तिमत्व, पत्रकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६५ व्या जयंती निमित्ताने २३ जुलै शुक्रवारी सकाळी दहा वाजता लातूरात लोकमान्य टिळक विचार मंच या संस्थेच्या वतीने सार्वजनीक जयंती साजरी न करता कोविड १९ च्या नियमाचे पालन करून सोशल डिस्टस पाळत लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते अभिवादन करुन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपाचे स्थायी चे माजी सभापती अँड शैलेश गोजमगुंडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव, नगरसेविका सौ वर्षा कुलकर्णी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांची उपस्थिती होती.
टिळक जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमास उत्तरादी मठाचे पंडित रघुत्तम आचार्य जोशी, वेदशास्त्र संपन्न आचार्य पाटील (नाशिक) लोकमान्य टिळक विचार मंच चे अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे, कार्याध्यक्ष संजय निलेगावकर सहसचीव हरिराम कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ श्रीनिवास संदीकर, कोषाध्यक्ष शेषराव कुलकर्णी, संचालक धनंजय बोरगांवकर, अँड नरेंद्र कुलकर्णी, माधवराव कुलकर्णी , माधव कुलकर्णी प्रा. भुजंग देशपांडे, युवा सेना जिल्हा प्रमुख अँड राहुल मातोळकर, दगडु मिटकरी, भानुदास भातंब्रेकर, गोपाळ जेवलीकर, कुलदीप कुलकर्णी, दिवान, दिपक कोटल वार, अँड गजानन चाकूरकर, बेंडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय निलेगावकर यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब देशपांडे तर आभार प्रदर्शन हरिराम कुलकर्णी यांनी मांडले.
लोकमान्य टिळकांचे स्मारक लवकरच उभा करु – उपमहापौर चंद्रकांत बिराजदार
यावेळी बोलताना लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लातूरच्या वैभवात भर घालणारे टिळक चौक येथे लोकमान्य टिळक यांचे स्मारक उभारण्यासाठी तातडीने महापालिका पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.