भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

दोन ठार तर एक गंभीर जखमी

लातुर (प्रतिनिधी) : औसा लातूर राज्य महामार्गावर ट्रक व दुचाकींचा अपघात झाला आहे. यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीच्या उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील वांजरखेड तांडा येथील राजाभाऊ राठोड, पत्नी सखुबाई राजाभाऊ राठोड आणि मुलगी स्वाती राजाभाऊ राठोड हे तिघे लातूर येथे राहत असलेले जावई अमोल लक्ष्मण आडे यांच्या घरी देवदेवाच्या निमित्ताने गेले होते. काल कार्यक्रम संपवून आज ते मूळ गावी वांजरखेड तांडा इथं जात असताना औसा लातूर राज्य महामार्गावरील कारंजे खडी केंद्राजवळ ट्रक व दुचाकींचा अपघात झाला यात राजाभाऊ राठोड, पत्नी सखुबाई राजाभाऊ राठोड जागीच ठार झाले तर मुलगी स्वाती राजाभाऊ राठोड ही गंभीर जखमी झाल्याने लातूरला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी वाहनाची कोंडी झाली होती. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

About The Author

error: Content is protected !!