गुजराती इंग्लिश स्कुलचा शंभर टक्के निकाल

गुजराती इंग्लिश स्कुलचा शंभर टक्के निकाल

लातूर (प्रतिनिधी) : येथील श्री गुजराती शिक्षण संस्था लातूर व्दारा संचलित श्री गुजराती इंग्लिश स्कुलचा शैक्षणिक वर्ष 2020 – 21 चा इयत्ता दहावीचा बोर्ड परिक्षेचा निकाल 100% लागला असून शाळेने गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून शासनाच्या 50 + 30 + 20 या सुत्राप्रमाणे निकाल तयार केला अजून एकुण 72 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार तयार झालेल्या या निकालाप्रमाणे शाळेतुन 100%गुण घेवुन प्रथम येण्याचा मान कु.नम्रता नंदकिशोर पालीवाल हिने पटकावला आहे तर कु.गायत्री गिरीश ब्याळे 99.40% घेवुन व्दितीय आली आहे.तर चि.प्रथमेश प्रदिप पांचाळ 99.20% घेवुन तृतीय आला आहे.

शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेतले तर विशेष प्राविण्यात 23 विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेच्या निकालाची ऊत्कृष्ट परंपरा कायम ठेवली. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे विश्वस्त ललीतभाई शाहा, खेताभाई पटेल शाळेचे अध्यक्ष कमलेशभाई ठक्कर सचिव विजयभाई शाहा, कोषाध्यक्ष लिनेशभाई चापसी, लितेशभाई शाहा, अजयभाई शाहा तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच शाळेचे प्राचार्य श्री.अशोक येत्नाळकर व माध्यमिक विभागाच्या प्रमुख स्मिता जोशी व सर्व शिक्षकवृदांनी अभिनंदन केले आहे.

About The Author