दयानंद कलाचे लोकनृत्य महाराष्ट्रात द्वितीय तर लोकगीत तृतीय

दयानंद कलाचे लोकनृत्य महाराष्ट्रात द्वितीय तर लोकगीत तृतीय

दयानंद शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांचा सन्मान

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाने लोकनृत्य स्पर्धेत लावणी हा नृत्यप्रकार सादर करून महाराष्ट्रात सर्व द्वितीय क्रमांक पटकावला तर लोकगीत या कला प्रकारात पारंपरिक गोंधळ सादर करून तृतीय क्रमांक पटकावला.या माध्यमातून दयानंद कला महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली.

लोकनृत्यात कु.ऐश्वर्या पाटील, कु.साक्षी आदमाने, कु.अरुणा आडे, कु.दीप्ती जाधव, कु.रूपाली हत्तरगे यांनी लावणी सादर करून दयानंदच्या यशात मानाचा तुरा खोवला. लोकगीत प्रकारात राजन सरवदे, कु. स्वरांजली पांचाळ, सचिन जाधव, ज्योतिबा बडे, कु.यशश्री पाठक, अधिराज जगदाळे व अनंत खलुले यांनी यशस्वी सहभाग नोंदवून यश खेचून आणले.
याच कार्यक्रमात भारत सरकारच्या वतीने आयोजित कला उत्सव 2020 मध्ये लोकनृत्य या कलाप्रकारात कु. तनुजा शिंदे ही महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल व दि 21 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय युवा उत्सवसाठी निवड झाल्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी साहेबांच्या शुभहस्ते रु 5000/- देऊन तिचा सन्मान केला. डॉ संदीपान जगदाळे यांनी संघप्रमुख म्हणून महाविद्यालयाचे नेतृत्व केले. यशस्वी स्पर्धकांना डॉ देवेंद्र कुलकर्णी, डॉ संदीपान जगदाळे, प्रा.शरद पाडे, सुरज साबळे, स्नेहा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लक्षीरमणजी लाहोटी, सरचिटणीस श्री रमेशजी बियाणी, संचालक श्री अजिंक्य सोनवणे, प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ देवेंद्र कुलकर्णी, डॉ संदीपान जगदाळे, प्रा सी.ए शिंदे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!