झोपेचे सोंग घेतलेल्या गोडभरलेनां जागं करण्यासाठी शिवसेनेचा हलगी नाद!
लातूर (प्रतिनिधी) : लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चिंचोली बल्लाळनाथ येथील ग्रामसेवक चलमले यांनी केलेल्या नियमबाह्य कामाबाबत निवेदन देऊनही अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई केलेली नसून झोपेचे सोंग घेणाऱ्या गटविकास अधिकारी गोडभरले यांना जागं करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ सारख्या मोठ्या गावाचा सज्जा ग्रामसेवक चलमले यांच्याकडे 1 वर्षापूर्वी देण्यात आला असताना गटविकास अधिकारी यांनी हरंगुळ बु सारख्या मोठ्या गावाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यामुळे चिंचोली बल्लाळनाथ येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजासंदर्भात त्रास सहन करावा लागत आहे या सदरबाबी संदर्भात लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दि. 12 डिसेंबर 2020 रोजी निवेदन देऊनही त्यांनी अद्याप पर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही. तसेच गटविकास अधिकारी नियमबाह्य काम करणाऱ्या व मर्जीतील ग्रामसेवकांना जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहेत व शहरालगतची मोठी आर्थिक उलाढालीचे गावे पुन्हा पुन्हा त्याच ग्रामसेवकांना देत आहेत म्हणून झोपेचं सोंग घेतलेल्या गटविकास अधिकारी गोडभरले यांना जाग करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.