शास्री विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन संपन्न
उदगीर:(एल.पी. उगिले)लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी अर्थ समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
व्यासपीठावर स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, कार्यवाह शंकरराव लासूणे, संस्था सभासद परमानंद निलंगे, चंद्रकांत धनबा, लक्ष्मीकांत नेलवाडकर, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की , पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट माधव मठवाले, प्रमुख वक्त्या करुणा गायकवाड उपस्थित होत्या.
करुणा गायकवाड यांनी संयुक्त महाराष्ट्राचा धगधगता इतिहास व कामगार दिनाचे महत्त्व विशद केले.तर तानाजी खोकले यांनी निकाल वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर कुलकर्णी,स्वागत व परिचय आशा गौतम,वैयक्तिक पद्य मंजुषा रुद्रवार प्रास्ताविक मनोज कराड तर आभार रामेश्वर मलशेट्टे यांनी मानले. जान्हवी देशमुख यांच्या कल्याणमंत्र्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
