वंजारवाडी साठी रस्ता खुला करून तहसीलदार बोरगावकरांनी विकासाचा मार्ग मोकळा.

0
वंजारवाडी साठी रस्ता खुला करून तहसीलदार बोरगावकरांनी विकासाचा मार्ग मोकळा.

उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील तोंडार ग्रामपंचायत अंतर्गत वंजारवाडी(मुंडेवाडी) हा रस्ता नसल्यामुळे विकासापासून दूर असलेल्या वाडीला तहसीलदार राम बोरगावकर यांनी भेट देत वाडीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा केला.स्वातंत्र्यानंतर वाडीवर पहिल्यांदाच अधिकारी आल्याने विद्यार्थिनींनी तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासमोर मनमोकळे पणाने शिक्षणासोबतच वाडीच्या विकासात येणार्‍या समस्यांबद्दल अंत:करण मोकळे केले.पहिली वेळ तहसीलदार वाडीवर आल्याने समाधान व आनंद व्यक्त केला .
तहसीलदार राम बोरगावकर यांनी वंजारवाडी या रस्त्याच्या संदर्भाने 20 दिवसापूर्वीच भेट देऊन लवकरात लवकर हा रस्ता लोकसहभाग घेऊन एकत्र बसून तोडगा काढावा अन्यथा वाडीला कायदेशीर रित्या रस्ता देण्याचे आश्वासन दिले होते .
गंडीपाटी पासून वंजारवाडी पर्यंतचा कच्चा रस्ता ते वापरत आहेत.परंतु रस्ता नकाशावर नसल्यामुळे त्या रस्त्याचे खडीकरण किंवा बांधकाम करणे शक्य झाले नाही.या रस्त्याची पाहणी करण्यासाठी वाडीवर तहसीलदारांनी भेट दिली, यावेळी रहिवाशा सोबतच विद्यार्थींनीनी त्यांच्या विविध समस्यांचा पाढा वाचला.
तोंडार ग्रामपंचायत हद्दीतील वंजारवाडीच्या रस्त्याचे, नाली काम व रुंदीकरण करण्याच्या कामाचा तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाला सुरूवात करण्यात आली. या कामाची सुरुवात झाल्यामुळे वाडीतील लहान थोर व्यक्तीकडून आनंद होत असल्याचे बोलले जात आहे .
वाडीतील पहीली ते सातवी या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या मुलीना रस्तानसल्याने शाळेला जाताना- येतांना पावसाळ्यातील होणारा त्रास, बऱ्याचदा पावसामुळे किंवा एकटी मुलगी असल्याने वाडी ते गंडीपाटी हे अंतर पार करणे शक्य होत नाही. त्यामुळे शाळेला हजेरी लावता येत नाही. अभ्यास बुडतो,तसेच रस्ता नसल्याने शाळा सोडण्याचीवेळ आनेक विद्यार्थीनीवर आल्याच्या तक्रारी ऐकून घेत संवेदनशील कर्तव्यदक्ष असलेल्या तहसीलदार बोरगावकर यांनी लागलीच रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन रस्त्याचे अतिक्रमण दूर करून नाली व रस्ता तयार होताना दिसत आहे . त्यामुळे सामाजिक जाणीव व कर्तुत्वान अधिकारी तहसीलदार राम बोरगावकर यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.
यावेळी कैलास उडते मंडळ अधिकारी तोंडार,तलाठी बाबासाहेब कांबळे, ग्रामसेवक उमाकांत मुंडे ,सरपंच भरत कोचेवाड, ग्रामपंचायत सदस्य गणपत वाघमारे , संदीप बिरादार व गुरुनाथ मुंडे,वंजारवाडी येथील गावकरी व शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!