उदगीरच्या विश्वशांती बुद्ध विहार पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याबद्दल आ. संजयजी बनसोडे यांचा सत्कार.

उदगीर (प्रतिनिधी) येथील विश्वशांती बुद्ध विहाराला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल, बहुजन विकास अभियानाच्या वतीने सोमनाथपुरात माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय बनसोडे यांचा जाहीर सत्कार नुकताच करण्यात आला. बहुजन विकास अभियानाच्या वतीने विश्वशांती बुद्ध विहार उदगीरला आंदोलन करण्या अगोदरच महाराष्ट्र शासनाचा दर्जा आमदार संजय बनसोडे यांनी मिळवून दिलेला आहे. त्यांच्या या विशेष प्रयत्नाबद्दल उदगीरकर त्यांचे ऋणी आहेत. कारण फार मोठे बौद्ध विहार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, हे कामे कधी न होणारे होते. उदगीर येथे या विश्वशांती बौद्धविरांच्या उद्घाटनाला राष्ट्रपतीला निमंत्रित करून, एक इतिहास निर्माण करण्याचे काम आ. संजय बनसोडे यांनी केल्याबद्दल त्यांचे समाजाचे कार्यकर्ते म्हणून जाहीर सत्कार करत आहोत, असे अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले. या वेळी मानसिंग पवार, शिवाजी मामा करकाळे, अमोल सूर्यवंशी, रवी डोंगरे, गोरख वाघमारे, सुनील पाटील, राजकुमार कारभारी, राजीव पवार, राजकुमार गाथाडे, राजू तगडे, सुशील कांबळे, बालाजी कांबळे यांच्यासह मुस्लिम बांधव व सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.