मनपाच्या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ,८६७ नागरिकांची तपासणी

लातूर (प्रतिनिधी)
आरोग्य विभाग,लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्यावतीने शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन आयुक्त देविदास जाधव व उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या वतीने केले जात आहे. त्यानुसार उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक दवाखाना अंतर्गत दर महिन्याच्या २९ व ३० तारखेला सार्वजनिक ठिकाणी/वॉर्ड मधे आरोग्य शिबिर घेण्यास सुरुवात झाली आहे . परंतु , मागील महिन्यात काही शिबिर झाली नसल्याने आज दि.०९/०५/२०२५ रोजी एकूण १४ ठिकाणी आरोग्य शिबीर घेण्यात आले व त्यात तब्बल ८६७ रुग्णांची तपासणी करण्यात आले .
मनपा आरोग्य विभागा अंतर्गत कार्यन्वित असलेले एकूण ३२ आरोग्य केंद्र येथे दैनंदिन आरोग्य सेवा सुविधा नागरिकांना मनपा देत असते.. परंतु शासकीय योजना व आरोग्य सुविधा अधिकाधिक नागरिकान पर्यंत पोचवण्याचा दृष्टीने संबंधित दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात दरमहा शिबिर घेऊन किमान १०० रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी विभागास दिले आहेत.
त्यानुसार आरोग्य विभागाने प्रत्यक्ष वॉर्ड मधे कैंप घेऊन यावेळी एकूण १४ आरोग्य केंद्र मार्फत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते दि. ०९/०५/२०२५ रोजी आरोग्य शिबिरामध्ये एकूण ८६७ रुग्णाची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले.या सर्व रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला असून रक्तदाब, मधुमेह रुग्णचे निदान व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे .या शिबिरास मनपा उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शंकर भारती यांनी भेटी देऊन आढावा घेतला.
सदरील आरोग्य शिबिर एप्रिल महिन्यापासून दरमहा २९ व ३० तारखेला नियमित पणे शहराच्या वेगवेगळ्या भागात होणार असल्याने मनपाच्या आरोग्य सेवा अधिकाधिक नागरीकापर्यंत पोचवता येतील व या आरोग्य शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान मनपा मार्फत करण्यात आले आहे.
सर्वाधिक रुग्णतापासणी आयुष्मान आरोग्य मंदिर ट्युशन एरिया अंतर्गत १२१ रुग्णाची तपासणी करण्यात आली व आयुष्मान आरोग्य मंदिर आनंद नगर अंतर्गत ११६ रुग्णाची तपासणी करण्यात आली. या दोन आरोग्य केंद्र १०० पेक्षा जास्त रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे.