व्यावसायीक अभ्यासक्रमाला (एमसीव्हीसी) विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा – प्राचार्य गोविंद शिंदे
लातूर (प्रतिनिधी) : जेएसपीएम लातूर शिक्षण संस्थेद्वारा स्वामी दयांनद एम.सी.व्ही.सी., एमआयडीसी, लातूर येथील भव्य ईमारतीमध्ये चालविली जाते. कॉलेजतर्फे क्रॉपसायन्स, कंन्स्ट्रक्शन टेक्नॉलाजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलाजी, मेडीकल लॅब, अॅनिमल हजबंडरी व डेअरी, अकौन्टींग व ऑफीस मॅनेजमेंट या कोर्सच्या प्रवेशासाठी 10 वी पास होणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशीत एस.सी., एस.टी.,एन.टी., ओ.बी.सी.,विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे एमसीव्हीसी प्रवेशासाठी ईच्छुक विद्यार्थ्यांनी स्वामी दयांनद एम.सी.व्ही.सी.एम.आय.डी.सी.लातूर या कॉलेजशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले आहे.
स्वामी दयांनद एमसीव्हीसी. कॉलेज हे एमआयडीसी येथील संस्थेच्या भव्य अशा इमारतीमध्ये सर्व सुविधायुक्त लॅब व तज्ज्ञ प्राध्यापकाद्वारे चालविली जाते. तसेच स्वामी दयानंद महाविद्यालयाअंतर्गत येणार्या एमसीव्हीसी अंतर्गत क्रॉपसायन्स, कंन्स्ट्रक्शन टेक्नॉलाजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलाजी, मेडीकल लॅब, अॅनिमल हजबंडरी व डेअरी, अकौन्टींग व ऑफीस मॅनेजमेंट आदी कोर्सचा समावेश असून या एम.सी.व्ही.सी.च्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग ठेवण्यात आलेला ओह. तसेच एम.सी.व्ही.सी.पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी मिळावी, यासाठी संस्थेच्यावतीने प्लेसमेंट सेल स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी स्वतंत्र राहण्यासाची व मेसची सुविधा करण्यात आलेली आहे. त्यामुळे ईच्छुक विद्यार्थ्यांनी स्वामी दयानंद एम.सी.व्ही.सी.एम.आय.डी.सी.लातूर येथे संपर्क साधून आपला प्रवेश त्वरीत करावा, असे आवाहन प्राचार्य शिंदे सर यांनी केले.