बामणी येथे गुणवंतांचा सत्कार संपन्न

बामणी येथे गुणवंतांचा सत्कार संपन्न

उदगीर ( एल.पी.उगीले ) : तालुक्यातील मौजे बामणी येथे दहावीच्या परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला.गावकर्‍यातर्फे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वीस विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे संस्थापक महात्मा गांधी अर्बन क्रेडिट सोसायटी व अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज उदगीर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन  श्रीकांत पाटील संस्थापक अध्यक्ष चंदरअण्णा प्रतिष्ठान उदगीर व श्री विजय कुमार पाटील बामणीकर संचालक भाऊसाहेब अर्बन बँक उदगीर तसेच बामणीचे उपसरपंच दिलीप कांबळे, माजी सरपंच दादाराव इंसुरे, श्री बाबाराव गंगापूरे, श्री शेषराव सूर्यवंशी गुरुजी, यशवंत कुमठेकर, श्री एकनाथ कांबळे गुरुजी सर्व पाहुण्यांचे व विद्यार्थी पालक यांचे स्वागत श्री राजकुमार बिराजदार यांनी केले.

  दीक्षित इंद्रजीत घोगरे यांनी 97 टक्के गुण प्राप्त केले.  तनुजा राजकुमार बिरादार हिने 96 टक्के 60 टक्के , मानसी शेषराव सूर्यवंशी हिने 94. 40 टक्के मार्क घेऊन गावात तिसरा क्रमांक मिळवला. सपना उत्तम बिरादार हिने 89 पॉईंट 40 ,सुवर्णा शहापुरे ,प्रेम कांबळे, प्रणिता एकनाथ कांबळे, दीक्षा माधव कांबळे, गणेश माधव बिरादार, दिव्या दिलीप कांबळे, रितेश बालाजी कांबळे, अंकुल दीपक  सोनकांबळे, किरण राजकुमार गंगापूरे, प्रज्ञा माधव कांबळे, संगमेश्वर तानाजी मेहेत्रे, संतोषी बळीराम गायकवाड, किशोर बालाजी कांबळे, अरुण धोंडीबा बामणे या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, ट्रॉफी, टिफिन ,श्रीफळ देऊन करण्यात आला.

 कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व गावकरी महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात हजर होते. सूत्रसंचालन श्री शेषराव सूर्यवंशी गुरुजी यांनी केले.तर प्रास्ताविक व स्वागत पर भाषण श्री राजकुमार बिराजदार यांनी केले .आभार श्री यशवंत पाटील गुरुजी यांनी मानले.

About The Author