कला शिक्षकांना ए एम चा ग्रेड मिळण्यासाठी विभागीय संचालकांना निवेदन

कला शिक्षकांना ए एम चा ग्रेड मिळण्यासाठी विभागीय संचालकांना निवेदन

अहमदपूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने विभागीय संचालक गणपतराव मोरे  यांची भेट घेऊन कला शिक्षकाच्या ए एम ग्रेड ए एम उत्तीर्ण झालेल्या तारखेपासून मिळावा. यासाठी लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष महादेव खळुरे यांनी संघटनेच्या वतीने निवेदन दिले.

राज्यातील कला शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कला शिक्षक महासंघ प्रयत्नशील आहे.अनेक प्रलंबित मागण्या शासन स्तरावरून मान्य झालेल्या असून सुद्धा लातूर विभागातील संबंधित शिक्षणाधिकारी यांचे कडून कला शिक्षकांना वेतन श्रेणी देण्यात येत नाही.यामूळे अनेक कलाशिक्षक श्रेणी पासून वंचित आहेत. वास्तविक आर्ट मास्टर पात्रतेसाठी देय असलेली पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांची वेतनश्रेणी आर्ट मास्टर पदविका प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून देणे आहे. आर्ट मास्टर परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 12 अनुसूची फ नुसार प्रवर्ग मध्ये देखील अशा कला शिक्षकांचा समावेश होतो. 

महाराष्ट्राची विविध विभागाचे शिक्षण उपसंचालकांनी आपल्या विभागातून कला शिक्षकांच्या बाबत असे लेखी पत्र काढून संबंधित कला शिक्षकांना  श्रेणीचा लाभ मिळवून दिलेला आहे.

लातूर विभागातील वंचित कलाशिक्षक बांधवांचे एटीडी टू ए एम वेतन श्रेणी पास झालेल्या दिनांकापासून मिळण्यासाठी  संघटनेने पत्र दिले होते, मागणी बाबतीत लवकर पत्र काढले जाईल असे आश्वासन संचालकानी दिले.

   महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले,प्रदेश सरचिटणीस  प्रल्हाद साळुंके,प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे,यांच्या सह लातूर जिल्हा अध्यक्ष महादेव खळुरे, उस्मानाबाद चे जिल्हा अध्यक्ष विकास भस्मे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले.

About The Author