एक्यूप्रेशर मसाज हा एक जुन्या आजारावर रामबाण उपाय – डाॅ. लखोटीया

एक्यूप्रेशर मसाज हा एक जुन्या आजारावर रामबाण उपाय - डाॅ. लखोटीया

             

उदगीर ( प्रतिनीधी ) : एक्यूप्रेशर ही शरीराच्या वेगवेगळ्या भागातील महत्वाच्या मुद्द्यांवर दबाव आणून रोगांचे निदान करण्याची एक पद्धत आहे.मानवी शरीर पायापासून डोक्यापर्यंत  हजारो मज्जातंतू, रक्तवाहिन्या,स्नायू,नसा आणि हाडे, डोळे,नाक कान,हृदय,फुफ्फुस इत्यादीनी जोडलेले आहे. शरीराची स्वयंचलित मशीन व्यवस्थित चालते म्हणून कोणत्याही एका बिंदूवर दबाव लागू केल्यास, त्याच्याशी जोडलेल्या संपूर्ण भागावर परिणाम होतो. असे डॉ. लखोटिया यांनी सांगितले. ते अरूणा अभय ओसवाल रेसोर्स सेंटर फॉर ब्लाईड येथील उदयगीरी ऐक्युप्रेशर व मसाज सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावैळी मंचावर उपस्थित डाॅ. जयप्रकाश पटवारी,शिवप्रसाद बोळेगावे शेअर मार्केट सल्लागार,एस.एस.पाटील,गणेश मुंडे,डाॅ.चव्हाण,अजय भालेराव,रेखा माने,चव्हाण सर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी ऑकुप्रेशर मसाज सेंटरचे माण्यवरांच्या हस्ते श्रीफल फोडून उद्घाटन केले.

उपस्थित माण्यवरांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना डॉ. लखोटीया म्हणाले, या सेंटर मध्ये अंध मुला मार्फत हे सेंटर चालविण्यात येत असुन यातुन भविष्यात येथील मुल हे स्वावलंबी बनले पाहीजेत.हा एकमेव उद्देश येथील शिक्षण घेत असलेल्या मुला बदल आहे. खरी गरज या अंध मुलांना आपल्या सारख्या मदत करणारे नागरीकांची आहे. या सेंटरची आज सुरुवात झाली असून आपल्या शहरातील नागरीकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवावे व व्याधी कमी करणयासाठी याचा लाभ घ्यावा. असे आव्हान  प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी  केले

यावैळी भोसले मॅडम,शिवाजी सुर्यवंशी व शाळेतील अंध मुल सामाजिक अंतर राखुन उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.पाटील यांनी केले तर आभार भालेराव सर यांनी मानले.

About The Author