छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात संभाजी महाराज यांची जयंती साजरी

उदगीर (एल पी उगिले) छत्रपती शिवाजी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती साजरी करण्यात आली.
प्राचार्य डॉ .रामकिशन मांजरे यांनी सर्वप्रथम संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पन करून पूजन केले. यावेळी डॉ. मांजरे म्हणाले संभाजी महाराज लेखक, साहित्यिक, युद्धनिपुण राजे व संस्कारशील व्यक्ती होते. अतिशय धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्वराज्याचा गाडा त्यांनी 1681 ते 1689 असे 9 वर्षे चालविला. असे गौरवोद्गार संभाजी महाराज यांच्या बद्दल डॉ.मांजरे यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जयंती समिती प्रमुख प्रा.डॉ.सुरेश शिंदे यांनी केले .या कार्यक्रमास प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.