संत गाडगेबाबा महाराज सामाजिक सेवा राज्यस्तरीय पुरस्काराने विनोद तेलंगे सन्मानित

0
संत गाडगेबाबा महाराज सामाजिक सेवा राज्यस्तरीय पुरस्काराने विनोद तेलंगे सन्मानित

उदगीर (एल पी उगिले)
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दिव्यांग व्यक्तींच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र धडपडणारे व्यक्तिमत्व विनोद तेलंगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान 2025 अंतर्गत राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्या पुरस्काराचे वितरण सोलापूर येथे झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या विभागीय मेळाव्यामध्ये करण्यात आले. या पुरस्कारामध्ये उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे काम करणारे विनोद तेलंगे यांना संत गाडगेबाबा महाराज सामाजिक सेवा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या सामान्य परिवारातील कार्यकर्त्याचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल लातूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्या सोबतच सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कौतुकाचा वर्षावही त्यांच्यावर होतो आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!