संत तुकाराम विधी महाविद्यालय येथे कायदेविषयक जनजागृत्ती शिबिर संपन्न
उदगीर (एल पी उगिले)
तालुका विधी सेवा समिती उदगीर आणि संत तुकाराम विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून उदगीर येथील प्रथम महिला जिल्हा न्यायाधीश न्यायमूर्ती आर.एम.कदम यांनी महिला सक्षमीकरनावर सखोल असे मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमांस सह -दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री भालचंद्र झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार नावंदर तर लातूर येथील दयानंद लॉ कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक बी.बी. पाटील, प्रा. जागीरदार, प्रा. दिप्ती नावंदर , प्रा. धनराज शिंदे, प्रा. प्रशांत पाटिल, कार्यालयीन अधिक्षक अजय कांबळे, लक्ष्मीकांत डोईजोडे,संभाजी कांबळे प्रदुम्न बिरादार तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा समितीचे विधिज्ञ महेश मळगे यांनी केले तर मनोगत प्रा. झेड. के. जागीरदार, विधी महाविद्यालयाची विध्यार्थीनी प्रतिक्षा पाटिल यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.जयवर्धन भाले यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. दिप्ती राजकुमार नावंदर यांनी मांडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे गुरुनाथ पाटील तसेच शिपाई कांबळे यांचे योगदान लाभले.
