श्यामलाल हायस्कूल दहावी बोर्ड परीक्षेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.जाधव मानसी शाळेतून 99.80% गुण घेऊन सर्वप्रथम

0
श्यामलाल हायस्कूल दहावी बोर्ड परीक्षेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.जाधव मानसी शाळेतून 99.80% गुण घेऊन सर्वप्रथम

उदगीर (एल पी उगिले) येथील श्यामलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा उत्कृष्ट निकाल आला आहे. उदगीर शहरातून उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम राखून श्यामलाल हायस्कूल च्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट निकाल देऊन केले आहे. त्याबद्दल श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, सचिव ऍड. विक्रम संकाये, सहसचिव अंजुमणी आर्य तसेच श्यामलाल हायस्कूल चे मुख्याध्यापक भारत खंदारे, पर्यवेक्षक राहूल लिमये, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी, उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान गुणवंत विद्यार्थिनी मानसी धनाजी जाधव यांनी 99.80% गुण घेऊन मिळवला तर द्वितीय क्रमांकावर अथर्व ओमप्रकाश कदम 99.40%गुण घेऊन यश संपादन केले तर तृतीय क्रमांकावर तांबोळी अमन इलीयास 99% गुण घेऊन यश संपादन केले आहे. याबद्दल सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
शाळेतून 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 40 विद्यार्थी आहेत तर विशेष प्राविण्यासाह 122 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, प्रथम श्रेणीत 66विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा शाळेचा एकूण निकाल 98.78% लागला आहे. उदगीर शहरातून उत्कृष्ट निकाल देण्याचे काम श्यामलाल हायस्कूल ने केले आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!