राजा भगीरथ इंग्लीश स्कूलचा निकाल 100 टक्के

उदगीर (एल पी उगिले) मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत उदगीर येथील उपक्रमशील शाळा राजा भगीरथ इंग्लीश स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेतून शिवानी संतोष चिमगावे ही विदयार्थिनीने 98.40 टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम आली आहे. तर अक्षरा अविनाश शिरसे हिने 97.40 टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय आली, तसेच सोहम आदिनाथ मरकड याने 91 टक्के गुण घेवून तिसरा आला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या कल्पना चामलवाड, संस्था सदस्य विजयकुमार चामलवाड शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.