शास्त्रोक्त पध्दतीने तपास करत 8 तासाचे आत खुनातील आरोपी अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी.

0
शास्त्रोक्त पध्दतीने तपास करत 8 तासाचे आत खुनातील आरोपी अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी.

शास्त्रोक्त पध्दतीने तपास करत 8 तासाचे आत खुनातील आरोपी अटक

लातूर (एल पी उगिले) : या बाबत माहिती अशी कि, दिनांक 14 मे रोजी गुन्ह्यातील मयत दयानंद भगवान काटे,वय 55 वर्ष राहणार बोपला तालुका जिल्हा लातूर याचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून गंभीर जखमी करुन खून केल्याची घडली होती. मयताच्या मुलाने फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे लातुर ग्रामीण येथे गुरन 117/25 कलम 103(1) भारतीय न्याय संहीता प्रमाणे दिनांक 14 मे रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पध्दतीने तपासाला सुरुवात केली. 
          पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे  यांनी सदर पथकाला सखोल मार्गदर्शन व सुचना करुन तात्काळ रवाना करण्यात आले होते. दरम्यान सदर पथकाने गोपनीय बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून तपासाची दिशा निश्चीत करुन आटोकाट प्रयत्न करत दयानंद काटे याचे मारेकरऱ्याचा शोध घेतला.

वरीष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथकांने यातील नमुद दयानंद काटे याचा मारेकरी मयताचा सख्खा लहान भाऊ
देवानंद भगवान काटे, (वय 43 वर्ष व्यवसाय शेती, राहणार बोपला तालुका जिल्हा लातूर) यास त्यांचे राहते ठिकाणाहून दिनांक 15/05/2025 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्याच्या 8 तासाचे आत आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन शेतीच्या बांधावरील भांडणाचा राग मनात धरून सख्या मोठ्या भावाचा खून केल्याचे कबुल केले आहे. गुन्हयाचा तपास लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, युवराज गिरी, राहुल सोनकांबळे,राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, रियाज सौदागर, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!