अकरावी प्रवेशासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मदत कक्ष

उदगीर (एल पी उगिले) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे अकरावी प्रवेश मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखांसाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य देण्यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. एन. हल्लाळे, एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक एस. व्ही. मुडपे व प्रा. टी. एन. सगर यांनी केले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये सुलभता निर्माण होणार आहे.