उदयगिरी अकॅडमीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा घोड्यावर बसवुन, फेटे बांधुन सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) शहरातील नामांकित शैक्षणिक संकुल उदयगिरी अकॅडमीतील धनश्री मोरे, स्वरांजली पंचडे आणि श्रेया कुलकर्णी या 3 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच विश्वजीत घोडके, पृथ्वीराज बिचकुंदे आणि धनश्री मोरे या विद्यार्थ्यांनी गणितात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.
विश्वजीत घोडके (99.40%), श्रुती बिरादार (99.20%), गोपी कल्याणी (99.20%), गणेश सातानूरे (99%), पृथ्वीराज घोडके (98.80%), सेजल कुलकर्णी (97.20%), पृथ्वीराज बिचकुंदे (97.20%), श्रध्दा डोंगरे (97%), अथर्व फुले (96.80%), श्रावणी गुंजोटे (96.80%), यशवंत बेल्कुंदे (96.80%), संजना बाराहाते (96.20%), ओम शिंदे (96.20%), बालाजी रेगुडे (95.80%), आदित्य पूल्ले (95.80%), शिवम गुंडरे (95.60%), प्रांजली सुरवसे (95.60%), पुरुषोत्तम जाधव (95.40%), वेदांत भोसले (95%), साक्षी पिंपळे (94.80%), बालाजी शेडोळे (94.60%), सुधांशु बलसुरकर (94.60%), सृष्टी वटटमवार (94.20%) व श्रध्दा पाटील, सदाशिव गव्हाणे, आदीती पाटील, भगवती जोशी, अजित गुरमे, सुमीत स्वामी, सिद्धी होळसंबरे, रचना पाटील, सपना चिखले, सृष्टी पाचंगे, कृतिका मलगे, सांची महालिंगे, नवनाथ पाटील, अनुराधा पाटील, श्रद्धा आगदे, सोहम मारकड, पृथ्वीराज रक्षाळे, ज्ञानेश्वरी जाधव अश्या एकूण 44 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. गणितात 100 पैकी 90 पेक्षा अधिक गुण घेणारे 29 विद्यार्थी तर विज्ञान मधे 100 पैकी 90 पेक्षा अधिक गुण घेणारे 21 आणि 100 पैकी 98 गुण घेणारे 5 तर इंग्रजीत 90 पेक्षा अधिक गुण घेणारे 21 विद्यार्थी आहेत.
या सर्व गुणवंतांचा सत्कार प्रमुख पाहुणे अमेरिकेत कार्यरत असणारे रसायन शास्त्रज्ञ डॉ.राम बब्रुवान आंब्रे, गणिततज्ञ प्रा.सचिन शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा.नंदिनी निटूरे, प्रा. निवेदिता भंडारे ,प्रा.गोविंद केंद्रे आदींनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटे बांधुन व सन्मान पूर्वक घोड्यावर बसवुन सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.