स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ महायुतीकडे, पक्षश्रेष्ठीकडून कौतुकाची थाप

0
स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ महायुतीकडे, पक्षश्रेष्ठीकडून कौतुकाची थाप

उदगीर (एल.पी.उगिले)
स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये महायुतीच्या पॅनलने बिनविरोध विजयी होत, जिल्ह्यामध्ये पहिली स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीच्या पारड्यात टाकली आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय भाऊ बनसोडे, निलंग्याचे आमदार तथा माजी पालकमंत्री संभाजी भैय्या निलंगेकर यांनी स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाचे कौतुक करून या पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या भरत चामले यांच्या पाठीवर शाबासीची थाप दिली आहे.
बिनविरोध निवड झाल्यानंतर भरत चामले यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मधील हारमुंजे किशनराव बापूराव, पाटील शंकरराव रामचंद्रराव, मुळे विठ्ठल दिगंबरराव, बिरादार रामराव व्यंकटराव, बिरादार विजयकुमार ईरवंत, देवणे उदयमाला शाहूराज, पाटे आशा सतीश, काळे बाबासाहेब शेषराव, पाटील प्रभाकर व्यंकटराव, सोनकांबळे वसंत नारायण, पवार मारुती पोमा यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्याला संधी दिली, आपण बिनविरोध विजयी झालो, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे, भाजपाचे नेते तथा माजी पालकमंत्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन ऋण व्यक्त केले. त्यावेळेस त्या सर्व नेत्यांनी जिल्ह्यातील पहिली निवडणूक महायुतीच्या बाजूने विजयश्री खेचून आणून एक वेगळा ठसा उमटवल्या बद्दल सर्व विजयी उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी रामराव मामा बिरादार, किशनराव हारमुंजे, विठ्ठलराव मुळे, शंकर पाटील, वसंतराव सोनकांबळे, विजयकुमार बिरादार, झुंजार पाटील, संग्राम भोसले, भालचंद्र घोणशीकर, ज्ञानेश्वर बिरादार, बाळासाहेब नवाडे, अंकुश बिरादार, मधुकर गुडे, विजयकुमार येडले इत्यादी प्रमुख कार्यकर्ते आणि विजयी उमेदवार उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!