वाळू धक्यावर धाड टाकून ६० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई.

0
वाळू धक्यावर धाड टाकून ६० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई.
लातूर (एल पी उगिले) लातूर जिल्ह्यामध्ये वाळू माफीयांनी चांगलाच हैदोस धुला घातला आहे. खुलेआम बिना नंबरच्या गाड्यातून गौण खनिजाचा उपसा आणि वाहतूक केली जात आहे. यासंदर्भात ओरड झाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने विशेष कारवाई करत तब्बल 60 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १७/०५/२०२५ रोजी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील मौजे हालकी जवळील शेंद शिवारातील मांजरा नदी पात्रातील वाळूची अवैधरित्या उपसा व वाहतूक होत आहे, अशी खात्रीशीर बातमी बी .चंद्रकांत रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग चाकुर यांना मिळाली. त्यावरून वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय कार्यालयातील पोलीस अधिकारी अमलदार,पोलीस स्टेशन चाकूर व शिरुर अनंतपाळ येथील अधिकारी अमलदारांची पथके तयार करून नमुद ठिकाणी १७/०५/२०२५ रोजी १९.०० वा.सुमारास बातमीप्रमाणे हालकी जवळील शेंद शिवारातील मांजरा नदी परिसरात छापा टाकला असता त्याठिकाणी आरोपीतांनी संगणमत करून मांजरा नदी पात्रातील वाळू गौण खणिज लोखंडी बोटी व सक्शन पंपाच्या साह्याने बेकायदेशीर, शासकीय विनापास परवाना, शासनाचे महसूल बुडविण्याच्या उद्देशाने व पर्यावरणाचा ऱ्हास होईल याची माहिती असताना देखील वाळूचा चोरटा उपसा करून अवैधरित्या चोरटी विक्री करण्यासाठी मौजे शेंद ता. निलंगा शिवारात मोकळ्या जागेमध्ये एकून अंदाजे २० ब्रास वाळू व सदर वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली १ लाखंडी बोट, सक्शन पंपासह १ पोकलेन मशीन, १ हायवा टिप्पर असे एकून ६०,८०,०००/- (साठ लाख 80 हजार रुपये)याचे मुद्देमालासह मिळून आले. सदर ठिकाणाहून मांजरा नदी पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली एक लोखंडी बोट,वाळू टिपर मध्ये भरण्यासाठी वापरण्यात आलेली पोकलेन,वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला हायवा टिप्पर (आरटीओ पासींग नं. एम.एच.४७ एस ०६०८) ,बेकायदेशीर रित्या उपसा केलेली वाळू अंदाजे २० ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी आरोपी बाळू बोडके (रा. शेंद ता. निलंगा जि. लातूर),आदित्य बालाजी पाटील,इरफान पठाण (रा. निलंगा ता. निलंगा जि.लातूर),ईश्वर पाटील (रा. निलंगा ता. निलंगा जि. लातूर),अर्जुन काशीनाथ डेचे (रा. औराद शहाजनी ता. निलंगा जि.लातूर),पोकलेन चालक,पोकलेन मालक व इतर ६ ते ७ इसम यांचे विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे गु.र.न. १२३/२५ कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. व कलम ४८ (७), ४८(८), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनीयम १९६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अन्सापूरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक अच्युत सुर्यवंशी, पोलीस अमलदार शिराज शेख, दिपक सोनकांबळे, सुर्यकांत कोळेकर, लक्ष्मण आरदवाड, रायभोळे, रितेश आंदुरकर, सगर, महादेव फुले, महिला पोलीस अमलदार पुनम शेटे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!