24 जुन रोजी अनाथ व दिव्यांगांच्या सर्व धर्मिय विवाह सोहळ्याचे आयोजन

0
24 जुन रोजी अनाथ व दिव्यांगांच्या सर्व धर्मिय विवाह सोहळ्याचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी )- येथील भारतीय अंधजन शिक्षण व प्रशिक्षण मंडळ लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ तथा प्रशासक श्री सिद्धेश्वर वर रत्नेश्वर देवालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 24 जून रोजी अनाथ व दिव्यांग व्यक्तींच्या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या आग्रहास्तव व सहकार्यातून सर्व धर्मीय अनाथ दिव्यांग वधूवरांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय लातूर या ठिकाणी करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवण्यासाठी दिव्यांग वधू वर व त्यांच्या पालकांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या विवाह सोहळ्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. नोंदणीसाठी 942 0 1 4 2 9 08 तसेच 9404137177, 9730388035 या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजक गोपाळ पाटील, नरसिंह घोणे, पंडित हनुमंते, मुरलीधर चेंगटे, अभय मिरजकर, एस. एम. जांबुतकर, संगमेश्वर जनगावे, प्राचार्य अनिल गायकवाड, माधव बाबुराव अंकुलगे पाटील, संजय सोनटक्के, विक्रम पांडे चाकूरकर, नियोजन समितीचे शिलरत्न गायकवाड, बालकिशन भालेराव, माणिक मोरे, अशोक शिंदे, जितेंद्र तोडकर, शिवानंद पटणे, भरत लोंढे, गोकुळ दंतराव, दशरथ सरवदे, बालाजी काळे यांच्यासह अन्य मान्यवर परिश्रम घेत आहेत. या विवाह सोहळ्यासाठी सामाजिक, राजकीय, व्यवसायिक, क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे अवाहनही करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!