लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न!

0
लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न!

उदगीर (एल.पी.उगिले) उदगीर तालुक्यातील हेर महसूल मंडल विभाग अंतर्गत असलेल्या मौजे लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ विभागात कमीत कमी चार गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करून शासनाच्या विविध योजनेची माहिती व लाभार्थी यांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी सर्वांची बैठक घेऊन प्रत्येक गावात लोक अभिमुख शिबिर घेऊन शिबिराचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावागावात ते भेट देत असून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेत रस्ते खुले करणे, ऍग्री स्टॅग शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या श्रावणबाळ, वर्धापकाळ योजना, संजय गांधी योजना, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना, आधार कार्ड, शिधापत्रिका वाटप अशा विविध योजना राबवण्यासाठी या ठिकाणी सर्व तंत्रज्ञान स्टॉलचे आयोजन करून प्रत्यक्ष लाभार्थी यांचे अर्ज भरून घेणे, फार्मर आयडी काढून देणे, शिधापत्रिका वाटप करणे, विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, अद्यावत सातबारा व फेरफारचे वाटप करणे असे काम यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहारा गावचे पोलीस पाटील दिलीप पाटील हे उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी गजेंद्र भोसले यांनी त्यांच्याकडील कामाची माहिती उपस्थिताना दिली. या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम महसूल अधिकारी अंकुश वडगाव व ग्राम वसूल अधिकारी अनुराधा अलगुले व महा-ई-सेवा केंद्राचे प्रमुख राहुल रक्षाळे यांनी केले होते. गावातील लाभार्थ्यासाठी विविध फॉर्म भरणे तसेच विविध योजनेची शपथपत्र सर्व लाभार्थी मोफत दिले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हेर मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा अलगले यांनी केले. सर्वांचे आभार अधिकारी अंकुश वडगावे यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी विशेषत: महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. हे शिबिर लोहारा येथे एक आठवडा चलविण्याचे आश्वासन राहुल रक्षाळे यांनी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!