छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी देवणे

उदगीर (एल.पी. उगिले )
छावा संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी प्रा. राजेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तसेच लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विशाल देवने व लातूर जिल्हा अध्यक्षपदी उत्तम बिरादार यांची निवड संघटनेचे अध्यक्ष राजेश मोरे यांच्या हस्ते संघटनेच्या विभागीय बैठकीत नांदेड येथे विश्रामगृहावर करण्यात आली. यात उपस्थित असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते अनिल पाटील, माधव मोरे, प्रशांत बिरादार, अजय बिरादार, नरसिंग बिरादार, महेश सूर्यवंशी, ओमकार मंगनाळे, शरद बिरादार, श्रीकांत मुळे, रामेश्वर मुळे, नरसिंग बिरादार खेरडा, बाळासाहेब निडवंचे, शंकर पाटील, व्यंकट शिंदे , लक्ष्मीकांत मुळे इत्यादीं च्या उपस्थितीत निवड करण्यात आली. या निवडीबद्दल लातूर जिल्ह्यात छावा संघटनेला पुन्हा त्याच जोमाने उभारी घेऊन, गाव तेथे शाखा स्थापन करून,शहर व गाव पातळी वरील कार्यकर्त्यांना न्याय देऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, सर्वांना सोबत घेतले जाईल असा विश्वास नूतन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच गरजूंना न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात येईल. असेही निवड झालेले युवा प्रदेशाध्यक्ष राजेश चव्हाण बोलताना व्यक्त केले.