घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा, संघटन बळकट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार – जिल्हाप्रमुख ॲड. ब्रम्हाजी केंद्रे

उदगीर (एल पी उगिले): होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. ब्रम्हाजी केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर तालुक्यांची पदाधिकारी आढावा बैठक उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करणे, पदनियुक्त्या, नवीन शाखा स्थापन करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रभावी रणनीती यावर सखोल चर्चा झाली.या बैठकीस युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. उर्मिला भगत, माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पांचाळ, जळकोट तालुकाप्रमुख उमाकांत एमडे, नगरसेवक संजय देशमुख, माजी तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील, विधानसभा संघटक मनोज बोधले, अहमदपूर शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, चाकूर शहरप्रमुख बाळू जाधव, जळकोट शहरप्रमुख बालाजी थोन्टे, ॲड. विष्णू चिंतालवार, माजी शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, उपतालुकाप्रमुख ॲड. रामदास काकडे, ॲड. शरद पाटील, प्रदीप पाटील, युवासेनेचे जयप्रकाश नंदगावे, अभंग मोटे, लक्ष्मण गुट्टे, सुरज पाटील (युवासेना शहरप्रमुख), जनार्दन वंजे (शहर संघटक जळकोट), देविदास घोडके (माजी उपतालुकाप्रमुख जळकोट), न्यानेश्वर मुसले, गणेश जाधव, ब्राह्मणांद जाधव, सखाराम गुराळे, सरोजा बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.लातूर युवासेनातर्फे कृष्णाजी सरवदे, गणेशजी पवार, गजानन चवळे, सुरज पाटील, आकाश जाधव तर उदगीर युवासेनातर्फे नागेश बिरकुले, प्रशांत ममदापुरे, गुणवंत वाडकर, महादेव दुलंगे, आयुष शिंदे, मुनाफ पठाण, आदिनाथ आंब्रे, आकाश आलेगावकर, आदित्य दळवी, वैभव बिराजदार, अनिकेत पाटील, गौतम गठडे, कामेश बिराजदार यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाप्रमुख ॲड. ब्रम्हाजी केंद्रे यांनी संघटनेच्या मजबुती साठी सर्व तालुक्यांमध्ये “घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा” हे सूत्र अंगीकारून कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच आगामी निवडणुकीत शिवसेना ठामपणे, योजनाबद्ध पद्धतीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.