पंचायत समितीच्या विशेष शिक्षक एस.पी.म्हेत्रे यांची स्वामी विवेकानंद विद्यालयास सदिच्छा भेट

पंचायत समितीच्या विशेष शिक्षक एस.पी.म्हेत्रे यांची स्वामी विवेकानंद विद्यालयास सदिच्छा भेट

लातूर (प्रतिनिधी) : जेएसपीएम लातूर द्वारा संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय एमआयडीसी,लातूर या शाळेस लातूर पंचायत समितीच्या विशेष शिक्षक एस.पी.म्हेत्रे यांनी सदिच्छा भेट देवून शासन आदेशानुसार शाळेची वाटचाल सुरू आहे, याची त्यांनी पाहणी करून शाळेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्‍त केले.

शासन आदेशानुसार शाळा सुरूवात करण्यासाठी काही सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार स्वामी विवेकानंद विद्यालयातील शाळा सुरू करण्यात आली. यामुळे शाळा सुरू करण्यासाठी प्रारंभीच्या टप्प्यात केलेली तयारी, बैठक व्यवस्था, स्वच्छता, विद्यार्थी, शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी, अभ्यासक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, ऑनलाईन आणि ऑफलनाईन शिक्षणाची सुरूवात, वेळापत्रक, परिक्षा, यासह अनेक बाबींची पाहणी केली तसेच शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्‍त केले तसेच संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधांचे कौतुक केले. आणि महत्त्वपूर्ण सुचनाही केल्या. यावेळी जेएसपीएम संस्थेचे समन्वयक निळकंठराव पवार, शाळेचे मुख्याध्यापक मोहन खुरदळे यांचे लातूर पंचायत समितीच्या विशेष शिक्षक एस.पी.म्हेत्रे यांनी कौतुक केले.

About The Author