उदयगिरीचा ध्रुव पारसेवार यास जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात 128 वा क्रमांक

0
उदयगिरीचा ध्रुव पारसेवार यास जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात 128 वा क्रमांक

उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी ध्रुव सुनील पारसेवार याने एनटीएमार्फत मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स (JEE Advanced) परीक्षेत देशात 128 वा क्रमांक पटकावला आहे. त्याला 300 पैकी 283 गुण प्राप्त झाले असून, हे यश अत्यंत गौरवास्पद मानले जात आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव ॲड. एस. टी. पाटील, सदस्य डॉ. आर. एन. लखोटिया, तसेच प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे आणि प्रा. टी. एन. सगर यांनी ध्रुवचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!