चंदनचोराला साहित्यासह विशेष पथकाने पकडले,तीन लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल पी उगिले) पुष्पा चित्रपटापासून लुटूपुटु च्या चंदन चोरांनी संघटित होऊन चंदनाची झाडे तोडणे आणि त्याची साल काढून बाजारात आणणे. असे प्रकार वाढल्याचे लक्षात येतात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या विशेष पथकाला मार्गदर्शन करून अवैध रीतीने चंदनाची होणारी तोडणी चोरटी वाहतूक थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विशेष पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत निलंगा तालुक्यातील तीन चंदन चोरांना मुद्देमालासह पकडले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या करिता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात दि.03/06/2024 रोजी विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून औसा पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरा नगर परिसरामधील एका पत्राच्या शेडवर छापेमारी करण्यात आली. सदर शेडमध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेला चंदनाचा गाभा व लाकडाची चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवले चंदन बाळगलेले तीनजण मिळून आले.तर एक इसम पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. उर्वरित तीन इसमाना ताब्यात घेऊन त्याचे व पळून गेलेल्याचे नाव,पत्ता विचारता त्यांनी
सुरेश बाबुराव जाधव,( वय 40 वर्ष, राहणार निलंगा), जनार्दन रावसाहेब पवार, (वय 40 वर्ष, रा. बुजरूकवाडी तालुका निलंगा),सूर्यकांत जाधव (वय 52 वर्ष रा. बुजरूकवाडी तालुका निलंगा),बालाजी विनायक व्होनताळे, (रा. इंदिरानगर औसा (फरार))असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 30 किलो चंदन,चार मोटरसायकली, एक वजन काटा असा एकूण 3 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा येथे कलम 41,42 भारतीय वन अधिनियम 1927 व 4 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 303(2),3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अमलदार रामहरी भोसले, गुंडरे, चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव यांनी केली आहे.
