काँग्रेसचा “शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व मेळावा”;संपन्न

0
काँग्रेसचा "शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व मेळावा";संपन्न

यवतमाळ (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आर्णी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने “शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र रोष व्यक्त करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावी तत्कालीन भाजपाचे पंतप्रधान पदाचे दावेदार नरेंद्र मोदींनी २० मार्च २०१४ रोजी ‘चाय पे चर्चा’ नावाने एक स्वप्नरंजित सोहळा घेतला होता. हाच तो शेतकऱ्यांसाठीचा काळा दिवस, खरंतर इथूनच त्यांची मरणाची मुहूर्तमेढ रोवली असंही म्हणता येईल. मोदींच्या खोट्या आश्वासनांवर, फसवेगिरीवर भोळ्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आले. या खोट्या आश्वासनांना सुमारे ११ वर्षे लोटली, पण बळीराजाच्या हिताचे निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. मोदींच्या पाऊलावर पाऊल ठेवत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं दिली. ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देऊ’ अशा घोषणा केल्या होत्या. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी तर दूरच, खत, बियाणे, औषधांचे भाव बेसुमार वाढवले आणि पीकविम्यातही बेईमानी केली. शेतीमालावर निर्यातबंदी, वाढती आयात आणि अर्थसंकल्पातील शेतीखर्चात कपात, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संपूर्ण कर्जमाफी, सरसकट पीकविमा, हमीभाव, मोफत वीज यांसारख्या मागण्या मेळाव्यातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजी राव मोघे, जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे, खा. प्रणितीताई शिंदे, आ. बाळासाहेब मांगुरुळकर, आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, वामनराव कासावार, वसंतराव पुर्के, माजी मंत्री अनिस अहमद, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, माधुरी आडे, गिरीश पांडव, स्वाती येंडे, किरन मोघे, वैशाली सवाई, अनिल आडे, मनीष पाटील, आरीज बेग, साहेबराव कामडे, तातूभाऊ देशमुख, डॉ. नदीम, राहुल ठाकरे, राजू कासावार, संजय खाडे, छोटू देशमुख, प्रदीप वानखेडे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!