परिसराचे नंदनवन करावयाचे असेल तर वृक्षारोपण करावे – चंदन पाटील नागराळकर
उदगीर (एल पी उगिले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, चि. अहान चंदन पाटील नागराळकर, प्राचार्य वसंत कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मैनोद्दीन सय्यद, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख संतोष चामले, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, सतीश जगताप, उमाकांत नादरगे, सुनील महिंद्रकर, धनराज काटू, प्रल्हाद येवरीकर, बालाजी कांबळे, सचिन बनाळे , शिवकुमार कोळ्ळे, सुधीर गायकवाड, गोविंद डिगोळे, मारोती मारकवाड, शंकर चितळे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, परिसराचे नंदनवन करावयाचे असेल तर वृक्षारोपण करावे. वृक्षांचे संवर्धन व संगोपन करणे ही काळाची गरज आहे. वृक्षामुळे आपल्याला शुद्ध हवा, पाणी, फळे, फुले मिळतात. प्रत्येकाने वृक्षारोपण करुन त्याला वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
उपस्थित सर्वांचे आभार एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी मानले.
