एकंबेकर महाविद्यालयात १०१ झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा
उदगीर (एल पी उगिले) येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महाविद्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या प्रजातींची १०१ झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. विजयकुमार पाटील होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण चळवळीत कार्यरत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ मुडपे, व्ही. एस. कुलकर्णी , शिरीष रोडगे,रामबिलास नावंदर,प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर ,आर. डी. गिरी यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.हिरा मोरतळे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयाचा परिसर प्लास्टिक मुक्त राहणार असल्याचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांनी यावेळी जाहीर केले. गेल्यावर्षी लागवड करण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रा. आनंद शिंदे, प्रा. रेखा देशमुख -लोणीकर, दत्ता जाधव, दिलीप जाधव, वसंत पवार, बजरंग कोळेकर यांनी पुढाकार घेतला.
