मातृभूमी महाविद्यालयाचा BCS प्रथम ,द्वितीय वर्षाचा 100% व BCA, BCS तृतीय वर्षाचा 94%निकाल

0
मातृभूमी महाविद्यालयाचा BCS प्रथम ,द्वितीय वर्षाचा 100% व BCA, BCS तृतीय वर्षाचा 94%निकाल

उदगीर (एल पी उगिले) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित व मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय उदगीर चा बीसीए व बीसीएस विद्यापीठाचा निकाल जाहीर झाला असून बिसीएस प्रथम व द्बितीय वर्षाचा निकाल १००% व तृतीय वर्षाचा ९४ % निकाल जाहीर झाला आहे. बीसीए तृतीय वर्षाचा ९४ % टक्के निकाल लागला आहे. बीसीए तृतीय वर्षात पाचुंडे ज्योती सुधाकर 84.6% प्रथम, कांबळे आयुष दीपक 81.56% द्वितीय, देवकते राहुल नामदेव 81.28% तृतीय तसेच बीसीएस तृतीय वर्षात जळकोटे आरती रामलिंग 80.28% प्रथम, सिरसे श्वेता वसंत 79.97% द्वितीय, चिल्लरगे प्रीती संजय 76.61% तृतीय, महाविद्यालयातून सर्वप्रथम, द्वितीय, तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे व प्राचार्य उषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा रणजीत मोरे, प्रा उस्ताद सय्यद, प्रा अश्विनी देशमुख, प्रा शितल पवार, प्रा शिवांगी वट्टमवार, प्रा दिक्षा स्वामी, ग्रंथपाल उषा सताळकर व महाविद्यालयातील दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयुर मुळे, संगीता दुडे, सय्यद सिमा, नंदिनी कांबळे, अन्वेष हिप्पळगावकर, प्रकाश गायकवाड, जगदिशा ओंकारे, मुबारक पटेल, अर्चना बिरादार यांच्यासह प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण अध्यापन भरपूर प्रात्यक्षिक प्रत्येक शनिवारी घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा गृहपाठ, वैयक्तिक मार्गदर्शनामुळे उदगीर, जळकोट, देवणी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मोठे असून या यशाबद्दल संजय राठोड मनसे जिल्हा आद्यक्ष, प्रा डॉ पंडित देवशेट्टे , सुधीर पाटील, शेषेराव धनुरे , प्रा रामदास मलवाडे, मुख्याध्यापक शिवाजी गिरी, विजय माळी, बँक मॅनेजर शिवाजी पाटील, मनोज गुरुडे, वसंत सिरसे, संतोष जिरोबे, किरण होळसंबरे, संभाजी शिंदे गुरुजी, काशिनाथ द्वासे, डॉ संजय कुलकर्णी, स्वारातीविचे दिलीप पाटील , डॉ रवि पाटील, कल्याण धनुरे, असिफ शेख, संजय स्वामी, अभिजित वराद, सुधीर तोडकर , आलोक मालू , महेश पत्रिके , सी ए चिंचोलकर यांच्यासह सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!