भाजपच्या संवाद बैठकीनंतर जिल्हाधक्षांनी नूतन पदाधिकाऱ्याकडे कारभार सोपवला
लातूर (एल पी उगिले) भारतीय जनता पार्टी लातूर शहर व लातूर ग्रामीणच्या सर्व प्रमुख नेते गण, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण संवाद बैठक पार पडली.
यावेळी दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष यांनी दोन्ही नूतन जिल्हाध्यक्ष यांना जिल्हाकार्यांचा पदभार बहाल करत त्यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच याप्रसंगी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद देखील घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांवर व येणाऱ्या आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्याचे आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यूजी पवार, आ. रमेशजी आप्पा कराड , माजी खा. सुनीलजी गायकवाड , माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, लातूर शहरचे नूतन जिल्हाध्यक्ष अजितजी पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीणचे नूतन अध्यक्ष बस्वराज पाटील, लातूर शहर ग्रामीणचे माजी अध्यक्ष दिलीपजी मालक देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शैलेशजी लाहोटी, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, लातूर शहर व ग्रामीणचे सर्व मंडलाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व प्रमुख पदाधिकारी व भाजपा परिवारातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
