थोर समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे व पद्मश्री सौ राहीबाई पोपरे यांचा हस्ते अरुणा कांदे यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार

0
थोर समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे व पद्मश्री सौ राहीबाई पोपरे यांचा हस्ते अरुणा कांदे यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार

लातूर (एल पी उगिले) येथील
आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय संस्था भारत, यांच्यातर्फे उन्हाळी अधिवेशन 2025 नुकतेच राळेगण सिद्धी येथे पार पडले. या ठिकाणी थोर समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण अण्णा हजारे व बीजमाता पद्मश्री सौ राहीबाई पोपरे,संस्थापक अध्यक्ष देवाजी तांबे यांच्या हस्ते स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथील मुख्याध्यापिका व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर महानगर अध्यक्ष श्रीमती अरुणा हरिश्चंद्र कांदे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथे शासनाच्या मियावॉकी (वृक्ष लागवड) उत्तम पद्धतीने जोपासना केली व विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीबद्दल वृक्षापासून होणारे फायदे,वृक्षांची नावे,त्यांची जोपासना याबाबतीत उत्तम माहिती विद्यार्थांना दिली जाते.तसेच शाळेतील मुलींचे शिक्षण,कुमारवयीन मुलींच्या समस्या याबाबतील मुलींना मार्गदर्शन केल्याबद्दल श्रीमती कांदे यांना यावर्षीचा पर्यावरण संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, संजीव मरेवाड, अरविंद पुलगुर्ले, अरविंद वाडकर, विश्वनाथ खंदाडे, बालाजी भोळे,सुरेश वंगवाड, मनोज भिसे, पद्माकर आयनाले, बस्वराज बिराजदार,व्यंकुराम उगिले, माधव मटवाड, गणेश नराळे, विजयकुमार पाटील, संतोष कुसनुरे, गणेश हंडरगुळे, रविंद्र जाधव, गणेश मरेवाड,तातेराव मुंडे,संभाजी मुंडे, अरुणा गुणाले,उल्का गुडे,तोळण देशमुख, अनिता यलमटे, गिरीजा लोंढे, चंद्रकला औटी, सुनिता पोटे, राजकन्या गंभीरे, मायावती येडले, सुनिता बारसुळे, सुनंदा बालवाड, वंदना अहंकारी आदींनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!