दोन दिवसात पाठ्य पुस्तकांचे वाटप पूर्ण करणार – धमनसुरे
उदगीर(प्रतिनिधी)
उदगीर शहरासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळांना दोन दिवसात मोफत पाठ्य पुस्तकांचे पूर्णपणे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रे प्रमुख धमनसुरे यांनी दिली.राज्य सरकारने मोफत पाठ्य पुस्तके पुरवठा केली असून पंचायत समिती शिक्षण विभाग उदगीरच्या वतीने शाळेला मोफत पाठ्य पुस्तकाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना पाठ्य पुस्तके वाटप करण्यात आली असून उदगीर शहरातील खाजगी अनुदानित शाळेला १० जून पासून जमहूर कॉलेज चर्च रोड उदगीर येथे पुस्तकांचे वाटप सुरु करण्यात आले आहे.पुढील दोन दिवसात खाजगी अनुदानित व माध्यमिक शाळांना पाठ्यपुस्तक वाटपाचे काम पूर्ण करणार असल्याचे केंद्र प्रमुख धमनसुरे यांनी पुस्तक वाटपावेळी बोलताना सांगितले.चालू शैक्षणिक वर्षात पाठ्य पुस्तकात थोडा बदल करण्यात आला असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेत मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
