साक्षी पिंपळे हिचा सत्कार संपन्न
उदगीर (एल पी उगिले) येथील गुणवंत विद्यार्थिनी कु.साक्षी हरिबा पिंपळे हिचा जिव्हाळा ग्रुप च्या वतीने जागतिक इयत्ता 10 वी वर्गात कौतुकास्प्द यश संपादन केल्या केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते जिव्हाळा ग्रुप च्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिव्हाळा ग्रुपच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदगीर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरवाडकर, नेत्रतज्ञ सौ. डॉ. ज्योतीताई सोमवशी , यांचेसह जिव्हाळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक विश्वनाथजी मुडपे, तसेच जिव्हाळा ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष दसरथ शिंदे , कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव हाळ्ळे व नादरगे , अमृतराव देशपांडे , यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून आशीर्वाद रुपी भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कांबळे डी.पी. , व्ही.एस. कुलकर्णी, विक्रम हलकीकर यांच्यासह जिव्हाळा ग्रुपचे सर्व सदस्य, विदयार्थी, पालक, पत्रकार, इ. उपस्थित होते.
या गुणवंत विद्यार्थी कार्यक्रम सोहळयात कु.साक्षी हरिबा पिंपळे हिचे मान्यवरांच्या हस्ते हार, शाल, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देवून साक्षीचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
