लिपीकाच्या मृत्यूस कारणीभूत शिक्षक तथा सचिवावर गुन्हा दाखल

0
लिपीकाच्या मृत्यूस कारणीभूत शिक्षक तथा सचिवावर गुन्हा दाखल

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी : तालूक्यातील टाकळी ता. देवणी येथील राष्ट्रीय विद्यालयातील लिपीक बस्वेश्वर स्वामी यांच्या मृत्यूस कारणीभूत शिक्षक तथा सचिवावर देवणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयताची पत्नी लता बस्वेश्वर स्वामी (रा.साकोळ) यांच्या जबाबाने देवणी पोलीसांनी शिक्षक तथा सचिव निहाल जाफरसाब सौदागर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. या बद्दल माहीती अशी की, टाकळी येथील लिपीक बसावेश्वर काशीनाथ स्वामी (वय ५२) यांनी दि.२२ एप्रिल २५ रोजी जवळगा ता. देवणी येथील मांजरा नदीत ऊडी मारून आत्महत्या केली होती.ते गेल्या ३० वर्षापासून शाळेत लिपिक पदावर कार्यरत होते. या शाळेतील पुर्वी मुख्याध्यापक व सद्य स्थीतीत शिक्षक असलेले निहाल सौदागर हे माझ्या पतीस शाळेचे ऑडीट माझ्या सांगण्या प्रमाणे करा शालेय व संस्थेचे कामकाज मी सांखीतल्या प्रमाणे करा अन्यथा तुम्हाला नौकरीवरून काढून टाकेन अशी वारंवार धमकी देत होते, अनेकदा पतींनी मला ही घटना सांगीतली. त्यामध्येच माझे पती शिक्षक निहाल जाफरसाब सौदागर यांच्या दैनंदिन माणसीक त्रासाला कंटाळलेले होते या बद्दल मी व शाळेतील शिक्षक माधव झेटींगराव जाधव (प्रभारी मु.अ) देविदास गंपू बनसोडे सेवक तसेच चरपले काशीनाथ शिवाजी यांनी अनेकदा साकोळ ता. शि. अनंतपाळ येथी घरी येऊन पतीस समजावून सांगीतले होते.अनेकदा पती बस्वेश्वर स्वामी हे कोठेतरी जाऊन जीव देऊन टाकतो असे म्हणत होते. माझ्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत शाळेतील शिक्षक निहाल जाफरसाब सौदागर हेच जबाबदार असल्याचे सांगीतल्यावरून देवणी पोलीसात भारतीय न्याय संहीता २०२३ कलम १०८ नुसार दाखल करण्यात आला असल्याची माहीती. देवणी पोलीसांच्या वतीनेही देण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!