पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम व शांतता बैठक संपन्न.

0
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम व शांतता बैठक संपन्न.
लातूर (एल पी उगिले)  पोलिस आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद राहावा ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता टिकून राहील, या दृष्टीने  नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानरीक्षक शहाजी उमाप  यांच्या उपस्थितीमध्ये लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये जनसंवाद कार्यक्रम व शांतता बैठक संपन्न झाली.  

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दिनांक 09 जून 2025 रोजी दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये जनसंवाद कार्यक्रम व शांतता समितीची बैठकीचे छोटेखाणी आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीस लातूर मधील प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, समाजसेवक, तसेच पत्रकार उपस्थित होते.
सदर जनसंवाद कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, गुन्हेगारी, अवैध धंदे या व इतर विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वसामान्यांना उद्भवणाऱ्या प्रश्नावर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात शहाजी उमाप यांनी निर्देशित केले.
सदर बैठकीस पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तेरने मॅडम, यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे व जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी,अमलदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!