सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

0
सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

देवणी (एल पी उगिले )
महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या “स्वराज्य सरपंच सेवा संघ – महाराष्ट्र राज्य” यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय सन्मान संमेलन 15 , जून २०२५’ मध्ये पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने रा. देवणी ता. देवनी जिल्हा लातूर व विराट ईस्ट चंदनचा भाटपाडा तालुका वसई जिल्हा पालघर यांना “राज्यस्तरीय समाजभूषण सन्मान २०२५” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
“गाव कर्तृत्वाचा… समाज नेत्वृत्वाचा” या संकल्पनेवर आधारित सन्मान संमेलन अहिल्यानगर येथे होणार असून, विविध क्षेत्रातील आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान देण्यात येतो. पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांनी समाजसेवा, नेतृत्व आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात व सर्वसाधारण जनता, शेतकरी, गोरगरीब, विधवा, अपंग व अनेकांच्या समस्यांमध्ये हाक दिले की धावत जाऊन मदत करणारे व हजर राहणारे उल्लेखनीय योगदान केल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सन्मान समारंभ दि. १५ जून २०२५ रोजी अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. या वेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांच्या या गौरवामुळे मित्रपरिवार ,सामाजिक कार्यकर्ते, लातूर, पुणे, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात नागरिक हा पुरस्कार घोषित झाल्यामुळे पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले असून, संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार आणि संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन पार पडणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!