मंडळ अधिकारी जाधव यांचा सत्कार

0
मंडळ अधिकारी जाधव यांचा सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) 

उदगीर तालुक्यातील हेर येथील महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी पंडित नामदेवराव जाधव यांची जळकोट तालुक्यातील घोणशी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला.
मंडळ अधिकारी पंडित जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून हेर येथे तलाठी पदापासून ते मंडळ अधिकारी म्हणून काम केले असून त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या शेतरस्ते, पाणंदमुक्ती अनेक प्रकारचे तंटे सोडवले व जलयुक्त शिवाराची शेतीउपयोगी कामे झाली आहेत. यामुळे मंडळ अधिकारी पंडित जाधव हे या परिसरात एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून परिचित झाले होते. त्यांची घोणशी येथे बदली झाली आहे. याबदद्ल त्यांचा करडखेल येथे सत्कार करण्यात आला.यावेळी करडखेल गावाचे चेअरमन शिवाजी निडवंचे, व्हाईस चेअरमन मनोहर हत्ते, पोलीस पाटील एकनाथ कसबे, मधुकर बजगिरे, किरण मुळे ,हनुमंत निडवंचे, पांडुरंग कसबे , सतीश कसबे दत्ता बुरले ,मधुकर कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!